खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी नेत्यांचा भाजपने राजकीय बळी का घेतला ? - Rohini Khadese attack on BJP over OBC reservation | Politics Marathi News - Sarkarnama

खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी नेत्यांचा भाजपने राजकीय बळी का घेतला ?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 जून 2021

रोहिणी खडसे यांनी पुन्हा भाजपवर हल्ला  चढविला आहे.

जळगाव : ओबीसी आरक्षण कायम करावे, यासाठी भाजप आज चक्का जाम आंदोलन करीत असताना रोहिणी खडसे यांनी पुन्हा भाजपवर हल्ला  चढविला आहे.  एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या बहुजन नेत्यांचा बळी का घेतला हे पण भाजपने सांगावे, असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे.Rohini Khadese attack on BJP over OBC reservation

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या अँड रोहिणी खडसे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका सुरू केली आहे.  ट्विटर वरून त्या दररोज भाजपवर हल्ला करीत आहेत. ओबीसी आरक्षण कायम करावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. त्याविरुद्ध रोहिणी खडसे यांनी टीका केली. त्यांनी म्हटले आहे की, भाजपने खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला ? हे पण सांगा ना..

ओबीसी साठी भारतीय जनता पक्षातर्फे होत असलेल्या चक्का जाम आंदोलनचे नेतृत्व जळगाव जिल्ह्यात त्यांच्या भावजय भाजप खासदार रक्षा खडसे करीत आहेत. त्या राज्य सरकार वर टीका करीत आहेत, तर रोहिणी खडसे या भाजपवर हल्ला करीत आहेत. राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे.

भाजपने ओबीसी चेहरा म्हणून खासदार रक्षा खडसे यांच्याकडे नेतृत्व दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आंदोलन होत आहे.  रक्षा खडसे यांनी प्रथमच आपल्या नणंद रोहिणी खडसे यांना कडक राजकीय उत्तर दिले आहे. त्यामुळे आगामी काळात खडसे विरूद्ध खडसे हा सामना होणार मात्र यातून अँड. रोहिणी खडसे व रक्षा खडसे यांचे नवे नेतृत्व पुढे येणार काय हे काळच ठरवेल.
 Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख