अखेर मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी पत्नी रश्मी आल्या धावून

मुख्यमंत्र्यांची पाठराखण करताना त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे रश्मी यांनी म्हटले आहे.
Ripped jeans CM Tirath singh Rawats wife rashmi rawat defends him
Ripped jeans CM Tirath singh Rawats wife rashmi rawat defends him

डेहराडून : फाटलेल्या जीन्सवरून महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांच्या बचावासाठी पत्नी रश्मी रावत धावून आल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करताना त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. 

फाटलेली जीन्स घालून महिला आपल्या मुलांवर काय संस्कार करणार? असे वादग्रस्त वक्तव्य रावत यांनी केले होते. त्यावरून सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह बॉलीवूडमधील अभिनेत्री, इतर क्षेत्रातील महिलांनी रावत यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला रावत यांच्याकडून अद्याप उत्तर देण्यात आलेले नाही. मात्र त्यांच्या पत्नी रश्मी रावत यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची पाठराखण केली आहे.

रश्मी रावत म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांचे म्हणणे पूर्णपणे दाखविले जात नाही. त्यांच्या जो संदर्भ दिला तेच दिसत नाही. महिलांचा समाज आणि देशाच्या निर्मितीमधील सहभाग अभूतपूर्व आहे. आपल्या देशातील महिलांच्या खांद्यावर आपला सांस्कृतिक वारसा, आपली ओळख आणि आपली वेशभूषा वाचविण्याची जबाबदारी आहे. 

दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही या वादा उडी घेतली आहे. रावत यांच्या वक्तव्यावरून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी या तिघांचे हाफ पॅन्टमधील जुने फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. 'हे भगवान, त्यांचे गुडघे दिसत आहेत', असे त्या फोटोंच्या वर लिहिण्यात आले आहे. 

सोशल मिडियावर लाखो नेटकऱ्यांनी रावत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. विशेषत: सर्वच क्षेत्रातील महिलांनी आपले फाटलेल्या जीन्सवरील फोटो शेअर केले आहेत. सोशल मिडियावर #RippedJeans व #RippedjeansTwitter हे ट्रेंड प्रचंड व्हायरल झाले असून तीव्र प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. 

काय म्हणाले होते रावत?

रावत यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यंमत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर ते लगेच वादात सापडले आहेत. डेहराडून येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी महिलांविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. एक प्रसंग सांगत त्यांनी महिलांविषयी टिप्पणी केली. अनेक महिला फाटलेली जीन्स वापरतात. पण अशा जीन्समुळे समाजात योग्य संदेश जाईल का? याचे मुलांच्या मनावर काय संस्कार होतील? चांगले संस्कार करण्याची जबाबदारी पालकांवर असते. एखाद्या स्वयंसेवी संस्थेत काम करणारी महिलाच असे कपडे परिधान करत असेल तर समाजावर होणारे संस्कार कसे असतील?, असे वक्तव्य रावत यांनी केले होते. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com