ब्राम्हण मुख्यमंत्र्याने दिलेले आरक्षण मराठा नेत्यांना टिकवता आले नाही  - The reservation given by the Brahmin Chief Minister could not be maintained by the Maratha leaders | Politics Marathi News - Sarkarnama

ब्राम्हण मुख्यमंत्र्याने दिलेले आरक्षण मराठा नेत्यांना टिकवता आले नाही 

भरत पचंगे 
रविवार, 20 सप्टेंबर 2020

सध्याच्या कोरोनाच्या भीषण काळात मुख्यमंत्री घरात, तर शिवसेनेचे कार्यकर्ते कुठे पळाले समजत नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी छावण्यांची कामे असती तर लगेच पुढे सरसावले असते.

शिक्रापूर (जि. पुणे) : मराठ्यांच्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही, तिथं ब्राम्हण मुख्यमंत्री झाल्यावरच आरक्षण दिलं गेलं. भाजपनं दिलेलं मराठा आरक्षणही महाआघाडीच्या नेत्यांना कोर्टात टिकविता आलं नाही.

सध्याच्या कोरोनाच्या भीषण काळात मुख्यमंत्री घरात, तर शिवसेनेचे कार्यकर्ते कुठे पळाले समजत नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी छावण्यांची कामे असती तर लगेच पुढे सरसावले असते.

कंगनाच्या घरावर एका दिवसात कारवाई करणारे सरकार बोगस बियाण्यांप्रकरणी अजूनही गप्प आहे. हे महाअपयशी सरकार घरी बसविलेले बरे, असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे शिरूर तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी महाआघाडी सरकार व मुख्यमंत्र्यांवर फटकेबाजी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्रापूर (ता. शिरूर) येथे कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात दादा पाटील फराटे बोलत होते.

ते म्हणाले, 'भाजप हा जातपात न माननारा आणि जनतेच्या कामाला प्रान्य देणारा पक्ष आहे. मराठ्यांच्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही, ते ब्राम्हण असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना दिलं. एवढं मोठं काम भाजप सरकारने करून दाखविले असताना सध्याच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना ते कोर्टात टिकविता आलं नाही.' 

"या सरकारला जनतेचं काहीच सोयरसुतक नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून कारभार करतात, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर राज्यभर फिरुन लोकांना दिलासा देत आहेत. शिवसेनेच्या विरोधात बोलणाऱ्या कंगनाच्या घरावर बुलडोझर चालविणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीवर अजूनही कारवाई करत नाहीत.

कोरोनामुळे भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर आहेत, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी दुष्काळी छावणींसारखे लाभाची कामे नसल्याने लोकांच्या मदतीला धावत नाहीत. असा सगळाच भोंगळ कारभार असलेले हे महाअपयशी सरकार घरी बसलेले बरे,' अशा शब्दांत फराटे यांनी राज्य सरकारवर टीका केली. 

अशोक पवारांवर नाव न घेता टीका 

शिरूरमधील व्हेंटिलेटरप्रकरणी संजय पाचंगे यांनी आरोप केल्यावर ते खोडून काढण्याऐवजी त्यांच्या तक्रारी थेट पोलिसांकडे करण्यात आल्या. भाजप पदाधिकाऱ्यांची चौकशी करायची. त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, असे करण्यापेक्षा आता कोरोना रुग्णांची चौकशी करा, आरोग्य मंत्र्यांनी जे वास्तव दाखविले, ते पहा, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी आमदार अशोक पवार यांचे नाव न घेता केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख