कोरोनाचा फैलाव वुहानमधील प्रयोगशाळेतूनच? चीनने जगापासून लपवलेली माहिती उघड

चीनने महत्वाची माहिती जगापासून व जागतिक आरोग्य संघटनेपासून (WHO) लपवली आहे.
Researchers from wuhan lab admitted in hospital before covid19 outbreak
Researchers from wuhan lab admitted in hospital before covid19 outbreak

वॅाशिंग्टन : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव नेमका कसा, याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही. कोरोना विषाणू मानवनिर्मित असल्याचा दावा अमेरिकेसह काही देशांनी केला होता. चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेत हा विषाणू तयार केला असावा, असा दावा चीनमधीलच काही शास्त्रज्ञांनीही केला होता. पण हे दावे चीनकडून सातत्याने फेटाळले जात आहेत. आता विषाणूच्या फैलावाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. (Researchers from wuhan lab admitted in hospital before covid-19 outbreak)

अमेरिकेतील वॅाल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्तानुसार, चीनने महत्वाची माहिती जगापासून व जागतिक आरोग्य संघटनेपासून (WHO) लपवली आहे. चीनच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा पहिला रुग्ण ८ डिसेंबर २०१९ रोजी आढळून आला होता. पण या विषाणूच्या संसर्गात एक महिना आधीच प्रयोगशाळेतील तीन संशोधकांना झाल्याचा दावा केला जात आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॅालॅाजी मधील तीन संशोधकांना नोव्हेंबर २०१९ मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीनही संशोधकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती, अशी माहिती वॅाल स्ट्रीट जर्नलने दिली आहे.

वृत्तामध्ये आजारी पडलेल्या संशोधकांची संख्या, वेळ आणि लक्षणे याची माहिती देण्यात आल्याने प्रयोगशाळेतूनच विषाणूचा फैलाव झाल्याच्या दाव्याला बळ मिळाले आहे. एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, हा अहवाल आमच्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्याने उपलब्ध करून दिली आहे. याची चौकशी व्हायला हवी. संशोधन करताना प्रयोगशाळेतील डॅाक्टर आजारी पडले असू शकतात. याबाबत आम्हाला पुरेशी माहिती मिळाली होती. 

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे वैद्यकीय सल्लागार अँथनी फॅासी यांनीही याबाबत सुचक वक्तव्य केले होते. हा विषाणु आपोआप निर्माण होऊ सकते, असे वाटत नाही. त्याचा तपास करायला हवा. अनेक देश WHO कडे चीनमधील प्रयोगशाळेची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी करत आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कोरोना विषाणुला 'चिनी विषाणू' असं म्हटलं होतं. चीनमधील प्रयोगशाळेतच विषाणूची निर्मिती झाल्याचा दावा त्यांनी त्यावेळी केला होता. 

दरम्यान, WHO च्या एका टीमने फेब्रुवारी महिन्यात चीनचा दौरा केला होता. पण या टीमलाही विषाणूचा फैलाव नेमका कुठून झाला, याबाबत माहिती मिळाली नाही. प्रयोगशाळेत विषाणू तयार करण्यात आल्याचा दावाही WHO कडून फेटाळण्यात आला आहे. पण आता नव्याने समोर आलेल्या माहितीमुळे WHO ला नव्याने शोधमोहिम हाती घेऊ लागू शकते. तशी मागणी अमेरिकेसह अन्य काही देश करू शकतात.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com