रेणू शर्मांनी दिली 24 तासांची मुदत! अन्यथा....

आलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करणे पोलिसांवर बंधनकारक असल्याचे कायदेतज्ञांचे मत
Dhananjay Munde
Dhananjay Munde

मुंबई : सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने मुंबई पोलिसांच्या विरोधात न्यायालयात  जाण्याचा इशारा रेणू शर्मा यांचे वकिल रमेश त्रिपाठी यांनी दिला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रेणू शर्मा यांनी डी. एन. नगर पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदवला. मात्र पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला नाही. रविवारपर्यंत एफआयआर दाखल केला गेला नाही तर सोमवारी स्थानिक कोर्टात जाण्याचा इशारा त्रिपाठी यांनी दिला आहे.

न्यायालयीन लढाईचा इशारा शर्मा यांनी दिला असताना दुसरीकडे भाजपने मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यासाठी सोमवारपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत पवारांनी मुंडे यांचा राजीनामा न घेतल्याने भ्रमनिरास झाला आहे. महिला मोर्चाच्या वतीने आता राज्यभर आंदोलन भाजप पुकारणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केेले. त्यानुसार मुंबई - चित्रा वाघ, पुणे - उमा खापरे, नाशिक - देवयानी फरांदे, 
ठाणे - माधवी नाईक, कोल्हापूर - निता केळकर यांच्या नेतृत्वाखाली संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन होणार आहे. 

रेणू शर्मा यांच्याच विरोधात अनेक तक्रारदार पुढे आल्याने त्यांच्या मूळ फिर्यादिचा विषय मागे पडला होता. तसेच तुम्ही माझ्याविषयी इतके बोलत आहात तर मीच तक्रार मागे घेते, असे शर्मा यांनी म्हटले होते. मात्र आज त्यांनी पुन्हा तक्रारीवर ठाम असल्याचे सांगत पोलिसांकडे जबाब नोंदविला. आपल्याला धमक्या येत असल्याची तक्रारही वकिल त्रिपाठी यांनी केली. 

सर्वोच्च न्यायालय काय सांगते? 
► जर तक्रारीत दखलपात्र गुन्ह्याचा उल्लेख असेल तर पोलिसांनी सीआरपीसी १५४ अंतर्गत तातडीने गुन्हा नोंदवायला हवा. या परिस्थितीत प्राथमिक चौकशी करुन गुन्हा दाखल करणे हे मान्य नाही

► जर मिळालेल्या माहितीमध्ये जर दखलपात्र गुन्ह्याचा उलगडा होत नसेल तर अशावेळी प्राथमिक चौकशी करुन मग दखलपात्र गुन्हा निश्चित करणे आवश्यक आहे

►  जर तक्रारीत दखलपात्र गुन्ह्याचा उल्लेख असेल तर अशा परिस्थितीत पोलिसांनी प्रथम गुन्हा नोंदवला पाहिजे. त्यानंतरच्या प्राथमिक चौकशीनंतर जर ही तक्रार चुकीची असल्याचे निष्पन्न होऊन प्रकरण बंद करण्याची वेळ आली तर पोलिसांनी तक्रारदाराला याच्या नोंदीची लेखी माहिती प्रकरण बंद केल्यानंतर एका आठवड्याच्या आत दिली पाहिजे. यात प्रकरण बंद करण्याची कारणे स्पष्ट करायला हवीत.

► जर दखलपात्र गुन्ह्याची माहिती फिर्यादी देत असेल तर गुन्हा नोंदवून घेण्याचे कायदेशीर कर्तव्य पोलिस अधिकाऱ्याला टाळता येणार नाही. जर असे घडले तर संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com