कोरोनावर रेमडेसिविरची मात्राही चालेना; केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार?

सुधारीत उपचार नियमावलीमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं आहे.
Remdesivir may be dropped soon in treating COVID19 patients
Remdesivir may be dropped soon in treating COVID19 patients

नवी दिल्ली : मागील वर्षभरापासून रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या लाखो कोरोनाबाधित (Covid-19) रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येत असलेली 'प्लाझ्मा थेरपी' बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता त्यापाठोपाठ रेमडेसिविर हे इंजेक्शनही उपचाराच्या यादीतून वगळण्याचे सुतोवाच करण्यात आले आहे. रेमडेसिविर परिणामकारक नसल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. (Remdesivir may be dropped soon in treating COVID19 patients)

कोरोना बाधित रुग्ण लवकर बरे होण्यात किंवा त्यांचा मृत्यू रोखण्यासाठी प्लाझ्मा थेरपी (Plasma Therapy) परिणामकारक नसल्याचे केंद्रीय टास्क फोर्सने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सुधारीत उपचार नियमावलीमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं आहे. सुरूवातीच्या नियमावलीनुसार मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना लक्षणे दिसल्यापासून सात दिवसांमध्ये प्लाझ्मा थेरपीला वापर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला होता. आता प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नसल्याचे टास्क फोर्सने स्पष्ट केलं आहे.

प्लाझ्माप्रमाणेच रेमडेसिविरही परिणामकारक नसल्याचे नवी दिल्ली येथील गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॅा. डी. एस. राणा यांनी म्हटलं आहे. इंजेक्शनचे सकारात्मक परिणामांचे कोणतेही पुरावे आढळून न आल्याने कोरोना उपचारातून लवकरच वगळण्याबाबत विचार व्हायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं टास्क फोर्सकडून लवकरच रेमडेसिविरला उपचारांच्या यादीतून वगळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डॅा. राणा म्हणाले, प्लाझ्मा थेरपीमध्ये आपण आधी कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा रुग्णाला देतो. जेणेकरून त्याच्यामध्ये अँटीबॅाडीज तयार होतील. पण संसर्ग झाल्यानंतर तशाही अँटीबॅाडी तयार होतात. मागील वर्षभरापासून आम्ही पाहिले की, प्लाझ्मा देऊनही रुग्णाच्या स्थितीत फारसा फरक पडत नाही. तसेच प्लाझ्मा सहज उपलब्धही होत नाही. शास्त्रीय आधारावर प्लाझ्मा थेरपीची सुरूवात झाली अन् पुरावांच्या आधारे ती बंद करण्यात आली. 

रेमडेसिविरच्या परिणामकारकतेबाबतही कोणतेही पुरावे आढळले नाहीत. ज्या औषधांचा काही उपयोग होत नाही, त्यांचा वापर थांबवायला हवा. त्यामध्ये रेमडेसिवरचाही समावेश आहे. ही औषधे लवकरच वगळली जाऊ शकतात. सध्या केवळ तीनच औषधे परिणामकारक ठरत आहेत, असेही राणा यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेक डॅाक्टरांकडून लगेचच रेमडेसिविर इंजेक्शन सुरू केले जाते. त्यामुळे मागील महिन्यात रेमडेसिविरचा मोठा तुवटडा निर्माण झाला होता. काळाबाजारही मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. नातेवाईक इंजेक्शनसाठी कित्येक पटीने जागा पैसे देत होते. इंजेक्शनसाठी रात्रंदिवस रांगा लागत होत्या. अजूनही इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच आहे. त्यामुळं या कालावधीत केंद्र सरकारनं रेमडेसिविर जादूची कांडी नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com