बंजारा समाजाचे धर्म गुरू डॅा. रामराव महाराज यांचे निधन - Religion Guru of the Banjara community Dr. Ramrao Maharaj passed away | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

   बंजारा समाजाचे धर्म गुरू डॅा. रामराव महाराज यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

बंजारा समाजाचे रामरावबापू महाराज यांचा  जन्म 7 जुलै 1935 रोजी पोहरादेवी येथे झाला. 

वाशिम : संत सेवालाल महाराजांचे वंशज समाजाचे धर्मगुरू डॅा. रामराव महाराज यांचे मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने राञी अकरा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. बंजारा समाजाचे रामरावबापू महाराज यांचा  जन्म 7 जुलै 1935 रोजी पोहरादेवी येथे झाला. 

त्यांची प्रकृती वर्षभरापासून अस्थिर होती, त्याच्यावर उपचार सुरू होते. काही महिन्यांपूर्वी श्वसनाचा ञास सुरू झाल्याने त्यांच्यावर मुंबई लिलावती रूगणालयात उपचार सुरू होते. काल कोजागीरी पौर्णिमेच्या दिवसी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी त्यांच्या सोबत मंहत शेखर महाराज होते. तसेच राष्ट्रीय बंजारा परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष किशनभाऊ राठोड होते. 

रामराव महाराज यांनी  1948 मध्ये पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज यांच्या गाधीवर वयाच्या 14 व्या वर्षी परिसरातील 52 गावच्या नाईक यांनी संत परशराम महाराज शिवलिन झाल्यावर बसविले. 12 वर्ष अनुष्ठान व 12 वर्ष मौन धारण केल्यावर बापू यांनी देशात भ्रमतीला सुरवात केली. बंजारा समाजाचे धर्मगुरू डॅा. रामराव महाराज यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राञी 11 वाजता जगाचा निरोप घेतला. रामराव महाराज यांच्याविषयी बंजारा समाजाची अपार श्रध्दा असुन त्यांच्या पार्थिवावर सोमवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कर करण्यात येणार असल्याचे माहिती मंहत बाबूसिंग महाराज, संजय महाराज बापुचे वंशज यांनी कळविले आहे.

हेही वाचा : नाभिक समाजाचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार..

 
पुणे  : सारथी संस्थेच्या धर्तीवर नाभिक समाजासाठी संत सेना महाराज अर्थिक विकास महामंडळ सुरू करून अर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, मराठा आरक्षण व धनगर आरक्षणा बरोबर नाभिक समाजाचा आरक्षणाचा विषय राज्य सरकारने मार्गी लावावा, अशी मागणी ओबीसी नेते व सकल नाभिक समाजाचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी आज केली आहे. समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देणार असल्याचे सोमनाथ काशिद यांनी सांगितले. नाभिक समाजाचा राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी म्हणून विधानपरिषदेवर घेऊन राजकीय न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी काशिद यांनी केली आहे. काशिद म्हणाले, "महाराष्ट्रातील ओबिसी समुहातील प्रमुख घटक नाभिक समाज ओबीसी नेतृत्वावर प्रचंड नाराज आहे. नाभिक समाजाला कधीच ओबिसी नेतृत्वाने विश्वासात घेतलेले नाही, एकही मागणी किंवा समाजाची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. राज्य सरकारने आम्हाला आमच्या हक्काचे SC आरक्षण व अॅट्राॅसिटी कायदा लागू करावा, नाभिक समाज गेली 30 वर्षेपासून आरक्षण व प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहे."
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख