58 दिवसात रिलायन्स कर्जमुक्त....

राइट्स इश्यू आणि टेलिकॉम कंपनी असणारी रिलायन्स जिओ मधील भागीदारीनं विकून कंपनीने ही रक्कम जमा केली होती.
4Mukesh_ambani_1
4Mukesh_ambani_1

पुणे :रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज रिलायन्स नऊ महिन्याअगोदरच कर्जमुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. आपल्या कंपनीच्या भागधारकांना त्यांनी याबाबत धन्यवाद दिले आहेत. मुकेश अंबानी यांच्या या विधानानंतर कंपनीच्या शेअर खरेदीत झपाट्याने वाढ झाली असल्याचे आढळले. 

रिलायन्सने 58 दिवसात 1 लाख 68 हजार 818 कोटी रूपये कमावले आहेत. मार्च 2020 पर्यंत कंपनीवर 161,035 कोटी रूपयांचे कर्ज होते. रिलायन्स जिओने फेसबुक, सिव्वर लेक, विस्टा इक्विटी पार्टनर्सस जनरल एटलांटिक, केकआर मुदाबला, एडीआईए, टीपीजीपासून 22 एप्रिलनंतर ही रक्कम कमावली आहे. 

रिलायन्सच्या कंपनी व्यवस्थापनाने 31 मार्च 2021 पर्यंत कर्ज मुक्त होण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. पण नऊ महिने अगोदरच कंपनी कर्ज मुक्त झाली आहे.  जगभर कोरोनामुळे लॅाकडाउन असताना कंपनीचे हे करून दाखविले आहे, उद्योगविश्वात हे पहिल्यांदाच घडत आहे.  राइट्स इश्यू आणि टेलिकॉम कंपनी असणारी रिलायन्स जिओ मधील भागीदारीनं विकून कंपनीने ही रक्कम जमा केली होती.  

वचन पूर्ण :  मुकेश अंबानी 

याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणले की कंपनीने नऊ महिने अगोदरच कर्जमुक्ती झाल्याने आम्ही भागभांडवलदार व हितचिंतकांच्या विश्वासाला पात्र ठरलो आहोत. भागभांडवलदारांना दिलेले वचन आम्ही पूर्ण केले आहे. 

हेही वाचा :पेट्रोलचा 'भडका'आणखी  वाढणार  
 
पुणे : गेल्या अठरा दिवसात पेट्रोल व डिझलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. एक जूनपासून पेट्रोल आठ रूपये ८५ पैसे तर डिझल नऊ रूपये १५ पैशांनी वाढले आहे. कोरोनाच्या काळात विविध देशात सुरू असलेले ‘लॉकडाऊन’ शिथिल होत असल्याने आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात वाढ होत आहे. परिणामी इंधनाच्या दरात रोज वाढ होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. आणखी काही दिवस ही वाढ कायम राहील. पेट्रोलचा दर आणखी दोन रूपयांपर्यंत वाढू शकतो, असेही या तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या अठरा दिवसात इंधनाच्या दरात सतत वाढ होत आहे. कोरोनाच्या संकटाने त्रस्त असलेल्या सामान्यांना या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसला आहे.  इंधनाच्या दरात सतत वाढ होत असल्याने महागाई वाढण्याची भीती आहे. रोजगाराची साधने बंद आहेत. अशातच महागाई वाढली तर काय करायचे हा सामान्यांपुढील प्रश्‍न आहे. इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी होऊ लागली आहे. येत्या काळात दरात आणखी वाढ होणार असल्याचे बोलले जात असल्याने अधिकच गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com