शरद पवारांच्या टीकेबाबत राज्यपाल कोशियारी म्हणाले...

पवार मोठे नेते आहेत.
Regarding Sharad Pawar's criticism, Governor Koshiyari said
Regarding Sharad Pawar's criticism, Governor Koshiyari said

मुंबई : शरद पवार हे देशातील मोठे नेते आहे, त्यांच्यावर टीका करायला पाहिजे का? असा पत्रकारांना उलटा सवाल करत राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देणे टाळले. (Regarding Sharad Pawar's criticism, Governor Koshiyari said ...)

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा जागांचा प्रश्न गेली आठ महिन्यांपासून कोशियारी यांच्या पातळीवर रखडला आहे. राज्य सरकारने राज्यपालांकडे १२ नावांची यादी पाठवली असल्याचे सांगण्यात येत आहे. विधान परिषदेच्या १२ आमदारांवरून महाविकास आघाडी आणि आघाडीचे नेते राज्यपालांवर टीकास्त्र सोडत असतात. आताही या नेत्यांना मुंबई उच्च न्यायालयाने केलेली टिपण्णीचा आधार मिळाला आहे. त्यावरून त्यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

विधान परिषदेच्या १२ जागांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, वाढत्या वयामुळे राज्यपालांच्या लक्षात आलं नसेल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पत्र अनेकदा राजभवनात गेले आहे. नवाब मलिक हेही गेले होते. मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ जाऊन आले. शहाण्याला शब्दाचा मार; पण शहाण्याला... त्यामुळे आता कुठेही शब्द वाया घालवणे गरजेचे नाही, असे म्हणत पवारांनी राज्यपाल कोशियारी यांच्यावर निशाणा साधला होता. 

यासंदर्भात आज एका कार्यक्रमात पत्रकारांनी कोशियारी प्रश्न विचारला होता, त्यावेळी त्यांनी पवार मोठे नेते आहेत. त्यांच्यावर टीका करायलाच हवी का? असे पत्रकारांना विचारत त्यावर भाष्य करण्यास नकार दिला होता.  

पुण्यात काय घडले होते?

राज्यपाल कोशियारी यांच्या हस्ते पुणे आयुक्त कार्यालय ( कौन्सिल हॉल) येथे स्वातंत्र्य दिनाचे ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीष बापट, काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे आदींची उपस्थिती होती. कोशियारी हे मान्यवरांची भेटी घेत असताना शरद रणपिसे यांनी राज्यपालांना 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत विचारले. त्यावेळी अजित पवारही तेथे होते. राज्यपाल म्हणाले, अजित पवार सोबत आहेत. ते माझे मित्र आहेत. राज्य सरकार आग्रह धरत नाही, तुम्ही का धरता? असे म्हणत राज्य सरकारलाच टोला लगावला. या वेळी अजित पवारांनी हसत-हसत आज स्वातंत्र्य दिन आहे या विषयावर नंतर बोलेन असे सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com