"शेतकरी वाचवा, कामगार वाचवा,' विरोधकांची संसदपरिसरात निषेध फेरी - Regarding NCP's entry, Khadse said, "I have not discussed with anyone or given any thought!" | Politics Marathi News - Sarkarnama

"शेतकरी वाचवा, कामगार वाचवा,' विरोधकांची संसदपरिसरात निषेध फेरी

वृत्तसंस्था
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

केवळ खासदारच नव्हे तर कृषी विधेयकाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. 

नवी दिल्ली : मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेकाच्या मुद्यावर विरोधीपक्षाचे नेते आज संध्यकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. विरोधीपक्षांनी कालपासून संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार टाकला आहे.

राज्यसभेत विरोधीपक्षांना जी वागणूक मिळाली ज्या पद्धतीने आठ सदस्यांना निलंबित करण्यात आले त्याचाही निषेध करण्यात आला आहे. 

त्याचाच एक भाग म्हणून राज्यसभेतील विरोधीपक्षेनेते गुलाम नबी आझाद, टीएमसीचे डेरेक ओब्रेन, समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांच्यासह विरोधीसदस्यांनी आज संसद भवनात निषेधाचे फलक हातात घेऊन फेरी काढली. शेतकऱ्यांना वाचवा, कामगारांना वाचवा असे फळक प्रत्येक सदस्यांच्या हातात होते. 

विरोधीपक्षनेत्यांच्या सदस्यांची एक बैठक आज गुलामनबी आझाद यांच्या कार्यालयात बोलविण्यात आली होती. या बैठकीत कृषी विधेयक आणि सदस्यांचे निलंबन यावर चर्चा करण्यात आली आणि राष्ट्रपतींची भेट घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. राष्ट्रपतींनी या कृषी विधेयकावर सही करू नये अशी विनंतीही या सदस्यांतर्फे केली जाणार आहे. यापूर्वी आझाद यांनी राष्ट्रपतींना एक पत्र लिहिले असून कृषी विधेयक शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असल्याने ते स्वीकारू नये अशी विनंती या पत्रात केली आहे. 

केवळ खासदारच नव्हे तर कृषी विधेयकाविरोधात देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.  तो टीका करीत आहे. तर सरकारच्या म्हणण्यानुसार जे कृषी विधेयक आणली आहेत त्यांने शेतकऱ्यांचाच फायदा होणार असून पूर्वीपेक्षा शेतकरी अधिक स्वातंत्र्य होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

हे ही वाचा: 
..तर हमीभावाचे खासगी विधेयक मंजूर करावे !

मुंबई : 'रावसाहेब दानवेजी, देशातील 160 शेतकरी संघटनांच्या वतीने आणि 21 विविध राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने मी लोकसभेत शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याचे विधेयक-2018 हे खासगी विधेयक मांडले आहे. तुम्हाला आणि तुमच्या पंतप्रधानांना शेतकऱ्यांच्याबद्दल एवढाच जर कळवळा असेल, तर लोकसभेत ते विधेयक मंजूर करा आणि मग शेतकरी हिताची भाषा बोला,' असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिले आहे. 

नरेंद्र मोदी सरकारने आणलेली कृषी विधायके ही शेतकऱ्यांच्या फायद्याचीच आहेत. विरोधकांकडून त्याबाबत गैरसमज पसविले जात आहेत. 21 व्या शतकात शेतकरी बंधनात न राहता मोकळेपणाने शेती करेल. शेतीमालाल ज्या ठिकाणी चांगला भाव मिळेल, त्याठिकाणी विक्री करण्याचा अधिकारी या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना मिळणार आहे. हे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख