0Rain_0
0Rain_0

'या' तीन जिल्ह्यात रेड अलर्ट...

मुंबई, रायगड आणि रत्नागिरी येथे येत्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या तीनही जिल्ह्यात अतिदक्षतेचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई, रायगड आणि रत्नागिरी येथे येत्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या तीनही जिल्ह्यात अतिदक्षतेचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानुसार ठाणे, पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त कऱण्यात आली आहे.  

पावसाची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी आपल्या टि्वटवरून आज होणाऱ्या पावसाबाबत नागरिकांना माहिती दिली आहे. नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. महत्वाचे काम असेल तर घराबाहेर पडा, पोलिसांनी टि्वटरवरून सांगितले आहे. 
 
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दक्षतेचा देण्यात आला आहे. भारत हवामान खात्याने (आयएमडी) जारी केलेल्या जिल्हा अंदाज आणि इशाऱ्यानुसार शनिवारी मुंबई येथे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना दोन दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडून नका, घरातच राहा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

हेही वाचा : परभणीमध्ये तीन दिवस संचारबंदी... 

परभणी : कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात गुरुवारीपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी अत्यंत कडक पध्दतीने केली जात आहे. सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्यासह शहरातील तीनही पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व कर्मचारी शहरात कर्तव्यावर हजर आहेत. परभणी शहरात गुरुवारी कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले पाच रुग्ण आढळले आहेत. या आधी सलग तीन दिवसापासून जिल्ह्यात व विशेषत: परभणी शहरात कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यातील १२३ नागरीकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यातील ९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ते आपआपल्या घरी परतले आहेत. परंतू अचानक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णामध्ये वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी शहरासह तालुक्याच्या ठिकाणी तीन दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे शहरात कुणालाही बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com