`मन की बात`ला विक्रमी डिसलाईक्सची डोकेदुखी! भाजपचा आयटी सेल म्हणतोय...... - record dislikes for Man Ki Baat video gives headache to BJP | Politics Marathi News - Sarkarnama

`मन की बात`ला विक्रमी डिसलाईक्सची डोकेदुखी! भाजपचा आयटी सेल म्हणतोय......

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

काॅंग्रेसने या डिसलाईक्सचे स्क्रिनशाॅट मोठ्या प्रमाणात शेअर केले....

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या व्हिडिओला युट्यूबवर मोठ्या प्रमाणात डिसलाईक्स दिसल्यानंतर भाजपने आयटी सेलला त्यामागे काॅंग्रेसचा हात असल्याचे म्हटले आहे. या विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी यामागे परदेशातील ट्रोल्सचा वाटा अधिक असल्याचे म्हटले आहे.

`मन की बात`ला मोठ्या प्रमाणात डिसलाईक्स मिळाल्यानंतर भाजपमध्येही खळबळ उडाली. त्यात देशाच्या जीडीपीचे आकडे सायंकाळनंतर जाहीर झाले. त्यामुळे `मन की बात`बद्दलची नाराजी आणखी वाढली. भाजपच्या यू ट्यूब चॅनेलवर शेअर झालेल्या या कार्यक्रमाच्या व्हिडीओला मंगळवारपर्यंत सुमारे साडेनऊ लाख डिसलाईक्स आणि अडीच लाख लाईक्स मिळाले होते. त्यावरून मालवीय यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार ‘मन की बात’ व्हिडिओला डिसलाईक करण्याचा संघटीत प्रयत्न झाला. काँग्रेसचा आत्मविश्वास इतका कमी झालाय की, ते हा एक प्रकारचा विजय मिळाल्याप्रमाणे साजरा करतायेत… पण यूट्यूबच्या डेटावरून दिसून येतेय की डिसलाईक्सपैकी केवळ दोन टक्के भारतातून आहे. उर्वरित ९८% नेहमीप्रमाणे भारताबाहेरून आहे”, असा दावा त्यांनी ट्विटरवरून केला आङे. ‘डिसलाईक’ करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला केला आहे. “परदेशातील बॉट्स आणि ट्विटर अकाउंट्स कॉंग्रेसच्या जेईई-नेटविरोधी मोहिमेचा कायमच भाग राहिले आहेत. राहुल गांधींच्या तुर्कीतील बॉट्सची सक्रियता खूप वाढली आहे. राहुल गांधींना तुर्कीचा एवढा पुळका का आहे?” , असा सवालही मालवीय यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, ३० ऑगस्ट रोजी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेला संबोधित केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ” या कार्यक्रमाचा व्हिडिओ भारतीय जनता पक्षाने युट्यूबवर पोस्ट केला. पण व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यावर बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया आल्या व मोठ्या प्रमाणात व्हिडिओ ‘डिसलाइक’ केला गेला. त्यामुळे हा विषय बराच चर्चेत आला. मंगळवारी दुपारपर्यंत हा व्हिडिओ 45 लाख युजर्सनी बघितला पण त्यातील केवळ दोन लाख 10 हजार हजार लाइक्स होते. तर, तब्बल नऊ लाख 43 हजार  जणांनी व्हिडिओ डिसलाइक केला. या व्हिडीओचा स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डिसलाईक करण्यामागे काय कारण?

बेरोजगारी, उत्पन्नात झालेली घट, त्यावर सरकार प्रयत्न करत नसल्याची नाराजी प्रतिक्रियांवरून दिसते. Talk About - Unemployment Talk About- Education Talk About- GDP Talk About- poverty Talk About- Privatisation Talk About- Fights Between Hindu Muslim Talk About - China Talk About- PM Cares Fund Talk About - This Pandemic Situation, अशा प्रतिक्रिया यावर आहेत. या वरील प्रतिक्रियेला अडीच हजारांहून अधिक लाईक्स आहेत.

‘मन की बात’ मोदी कोणत्या विषयावर बोलले?

‘मन की बात’मध्ये मोदी म्हणाले की, “जगातील खेळण्यांच्या ७ लाख कोटींच्या बाजारपेठेत भारताचा वाटा खूप कमी आहे. तो वाढवण्याची गरज आहे. नवउद्यमींनी एकत्र येऊन खेळणी तयार करावीत. स्थानिक खेळण्यांसाठी आग्रह धरण्याची हीच वेळ आहे. तरुण उद्योजकांनी मुलांसाठी भारतात संगणकाधारित खेळही तयार करावेत. ते खेळ भारतीय संकल्पनांवर आधारित असावेत,” 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख