पुणे : कर्जावरील व्याजदरात (रेपो रेट) रिझर्व्ह बॅंकेने कपात केली असून हा दर आता चार 4.40 टक्क्यांवरून चार टक्के करण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंक बॅंकांना ज्या दराने वित्तपुरवठा करते त्याला रेपे रेट म्हटले जाते. या निर्णय़ामुळे बॅंकांना आणखी स्वस्त कर्जपुरवठा होणार आहे. या आधी घेतलेल्या निर्णयात हा रेट पाऊन टक्क्यांनी कमी करण्यात आला होता. तसेच कर्जावरील हप्ते भरण्यात आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांतील हप्ते न भरण्याची सवलत ग्राहक घेऊ शकतात.
ही सवलत वर्किंग कॅपिटल, टर्म लोन आणि होमलोनसाठीही मिळू शकते. ही सवलत आधीच्या तीन महिन्यांतही देण्यात आली होती.
रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात ही घोषणा करण्यात आली. कोरोना-कोविडच्या पार्श्वभूमीवर श्री. दास यांची गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी पत्रकार परिषद होती. याआधी त्यांनी 27 मार्च रोजी आणि 17 एप्रिल रोजी महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोविड संकटाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला, याचा आढावा घेतला. त्यानुसार ग्राहकोपयोगी उत्पादने 20 टकक्यांनी तर औद्योगिक उत्पादन 17 टक्क्यांनी घटल्याचे त्यांनी सांगितले. जीडीपीवाढीचा दर हा उणे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ही पण बातमी वाचा : पुण्यात ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी यशस्वी
पुणे : ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीची पहिली मानवी चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले, अशी माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाँ. मुरलीधर तांबे यांनी दिली.
महापालिकेच्या डाँ. नायडू रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीने ससून रुग्णालयात सर्वप्रथम प्लाझ्मादान केले. रक्तातील एक घटक असलेल्या प्लाझ्मामध्ये अँटीबाँडीज तयार झालेल्या असतात. कोरोना विषाणूंच्या विरोधात लढण्याची शक्ती शरीराला या अँटीबाँडीजमधू मिळते. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीने दान केलेल्या प्लाझ्मा कोरोनाबाधीत रुग्णाला दिला जातो. त्याला प्लाझ्मा थेरपी म्हणतात.
ससून रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग झालेला अत्यवस्थ रुग्णावर ही चाचणी करण्यात आली. या रुग्णाला उच्च रक्तदाब होतो. हायपोथायराँईडीझम आणि स्थुलता असे आजार होते. अशा आजारांच्या रुग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू होत असल्याचे आतापर्यंतचे निरीक्षण होते. कोरोनासह इतर आजार असणाऱया रुग्णाला 10 आणि 11 मे या सलग दोन दिवशी दाना केलेला 200 मिलीलिटर प्लाझ्मा संक्रमित करण्यात आला. यामुळे या रुग्णाची प्रकृती सुधारली. रुग्णाला व्हेंटीलेटवर बाजूला करण्यात आला. प्लाझ्मा थेरपीनंतर अवघ्या तिसऱया दिवशी रुग्ण स्वतः श्वसोच्छास घेऊन लागला. प्लझ्मा दिल्यानंतर पंधराव्या दिवशी संसर्ग बरा झाला. रुग्णाची प्रयोगशाळेतील चाचणीतून रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले, असेही डाँ. तांबे यांनी सांगितले.

