राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे आता कुठे आहेत.. - Raut said, "Where are the people in Maharashtra who are demanding presidential rule. | Politics Marathi News - Sarkarnama

राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे आता कुठे आहेत..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

जे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा म्हणून मागणी करीत होते. त्यांनी उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करावी.

मुंबई : "उत्तर प्रदेशला रामराज्य म्हटले जाते, तिथं एका मुलीचा बलात्कार करून खून होतो. आरोपींना वाचविले जाते. अन्य वेळी मात्र, कुणाच्या घरावरील कौले जरी उडवली जातात, एका अभिनेत्रीबाबत तेव्हा अन्याय अन्याय म्हटले जाते. तेव्हा महाराष्ट्रावर आरोप करणारे रामदास आठवले कुठे आहेत ? असा प्रश्न शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

हाथरस (उत्तरप्रदेश) येथे एका 19 वर्षीय दलित युवतीचा बलात्कार करून हत्या करण्यात आल्याने संपूणे देशभर पुन्हा एकदा संपापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की मी कुणाच्याही राजीनाम्याची मागणी करणार नाही, जे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा म्हणून मागणी करीत होते. त्यांनी उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करावी.

वेगळ्या राज्यात अशा घटना घडतात, तेव्हा आवाज उठतो मग आता का नाही ?
आम्ही शांतपणे याकडं पाहतोय. संधी मिळेल तेव्हा आवाज उठवेन. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणा-यांनी आता युपीबाबत ती मागणी करावी.

आपल्या पोटच्या काळजाचा शेवटी चेहरा ही पोलिसांनी पाहू दिला असे सांगत पडित युवतीच्या आईवडिलांनी हंबरडा फोडला. पोलिसांनी माझ्या लेकरावर अंत्यसंस्कार करण्यासाठी इतकी का घाई केली याचं उत्तर आम्हाला हवं, आम्हाला मायबाप सरकारनं न्याय द्यावा अशी हातजोडून विनंतीही केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींना कठोर शासन करण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. या धक्कादायक प्रकरणानंतर यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारवर चौबाजूने हल्लाबोल होत आहे. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्‌विट करून या प्रकरणाचा निषेध करतानाच योगी सरकारला आरोपीच्या पिंजण्यात उभे केले आहे.

पिडितीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर अंत्यसंस्कार रात्रीच का आटपून घेतले हा प्रश्‍नही केला आहे. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार पिडितीच्या नातेवाईकांच्या परवानगीनेच रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. हे सर्व असले तरी हाथरस प्रकरणाने निर्भयाप्रकरणाची आठवण देशाला करून दिली. ज्या दलित मुलीवर अत्याचार झाले ते निदर्यपणे केले होते. बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशाला हादरा बसला आहे. 

पिडितेच्या वडलांनी डोळ्यातून अश्रू गाळत एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले, की नातेवाईक सोडा आमच्या लेकराजवळ आम्हालाही जावू दिले. तिचा चेहराही नीट पाहता आला नाही. सकाळी अंत्यसंस्कार करू या अशी हातजोडून मी मागणी करीत होतो पण, पोलिसांनी ऐकले नाही. जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीचा मृतदेड पोलिस घेऊन गेले आणि अंत्यसंस्कार केले. 

गेल्या 14 सप्टेबररोजी पिडितेवर चार ते पाचजणांनी बलात्कार केला होता. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. या मुलीची काल प्रकृती खालावल्यानंतर तिला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या मानेची हाडं तुटण्याबरोबरच जीभलेही जखम झाल्याचे दिसून येत आहे. बलात्कार आणि हत्याप्रकरणात पोलिसांना चार नराधमांना अटक करण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख