खळबळजनक : सत्ता स्थापनेवेळी रश्मी शुक्लांनी महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केले!

भाजपच्या एजंट म्हणून काम करताना रश्मी शुक्ला यांनाफोन टॅपिंगची सवय झाली होती, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
Rashmi Shukla tapped the phones of important leaders says nawab malik
Rashmi Shukla tapped the phones of important leaders says nawab malik

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच हा अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने पलटवार केला आहे. रश्मी शुल्का यांनी महाराष्ट्र सरकार स्थापन करताना निर्माण झालेल्या संकटावेळी बेकायदेशीरपणे महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. 

फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस म्हणाले, "वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी काम करणारे एक रॅकेट मंत्र्यांचे नाव वापरते आहे. बदल्यांबाबत पोलिसांबरोबर थेट बोलणे होत आहे, अशी माहिती शुक्ला यांना मिळाली होती. काॅल रेकाॅर्डिंग सुरु झाले त्यावेळी स्फोटक माहिती समोर आली. या साऱ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर याचा संपूर्ण अहवाल शुक्ला यांनी २५ आॅगस्ट २०२० रोजी महासंचालकांना दिला."

फडणवीस यांच्या या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगेच पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर पलटवार केला. गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री थेट कोणत्याही बदल्या करत नाहीत. त्यासाठी स्वतंत्र मंडळ असते. त्यामुळे फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत. शुक्ला यांच्या अहवालात आरोप करण्यात आलेल्या ८० टक्के बदल्या झाल्या नाहीत. शुक्ला यांनी खोटा अहवाल तयार केला.

फोन टॅपिंगसाठी त्यांनी कोणतीही परवानगी न घेता ३० लोकांचे फोन टॅप करत होत्या. त्यांनी महाराष्ट्रात सरकार बनविण्याचे संकट असताना त्यांनी सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप करत होत्या. भाजपच्या एजंट म्हणून काम करताना त्यांना फोन टॅपिंगची सवय झाली होती. त्यामुळे त्यांना शिक्षा म्हणून इतर पदावर नियुक्ती करण्यात आली. दिल्लीत गेले दोन अधिकारी त्याकाळात भाजपसाठी काम करत होते, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.
केंद्रीय गृह सचिवांकडे अहवाल देण्याचा अर्थ काय? असा सवाल करून मलिक म्हणाले, सरकारची बदनामी करण्याचा कट असल्याचे सिध्द होत आहे. राजकीयदृष्टीने सरकार पाडता आले नाही आता अधिकाऱ्यांना हाताशी धरून कट कारस्थान केले जात आहे, असेही मलिक म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com