कुलगुरू बनविण्यासाठी घेतले पैसे; रामसेनेच्या अध्यक्षाला अटक - Ramsena Karnataka state president Prasad Attavar arrested for cheating | Politics Marathi News - Sarkarnama

कुलगुरू बनविण्यासाठी घेतले पैसे; रामसेनेच्या अध्यक्षाला अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मार्च 2021

प्रसाद अत्तावर हा श्रीराम सेना या हिंदुत्ववादी संघटनेमध्ये सक्रीय कार्यकर्ता होता.

मंगळुर : पैसे घेऊन नोकरी लावण्याचे अमिष दाखवत लोकांची फसवणुक करण्याच्या आरोपाखाली कर्नाटकातील रामसेनेच्या अध्यक्षाला पोलिसांनी आज अटक केली आहे. लोकांची फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

प्रसाद अत्तावर असे रामसेनेच्या अध्यक्षाचे नाव आहे. यापूर्वी तो श्रीराम सेना या हिंदुत्ववादी संघटनेमध्ये सक्रीय कार्यकर्ता होता. या संघटनेतून बाहेर पडत त्याने रामसेने संघटना स्थापन केली. सध्या तो या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. ही संघटना भाजपशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे.

मंगलुर विद्यापीठामध्ये कुलगुरू पद मिळवून देण्याचे अमिष दाखवत त्याने एकाची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. या प्रकरणामध्ये अत्तावर याला आज अटक करण्यात आली. 

विवेक आचार्य यांनी याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार अत्तावर याने त्यांच्याकडून आतापर्यंत 17.5 लाख रुपये घेतले आहेत. आचार्य हे विद्यापीठामध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहे. त्यांना विद्यापीठाचे कुलगुरू बनविण्याचे अमिष अतावर याने दाखविले होते. पण वर्ष उलटल्यानंतरही अतावरकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आचार्य यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार त्याला आज अटक कऱण्यात आली आहे. 

विद्यापीठातील अंतर्गत लॉबींगमुळे कुलगुरूपद मिळाले नाही. या संधीचा फायदा घेत प्रसादने संपर्क साधत जवळीक निर्माण केली. त्याने कुलगुरू बनविण्यासाठी मदत करतो, असा दावा केला. मुख्यमंत्र्यांशी आपले जवळचे संबंध आहेत, असे प्रसाद यांने सांगितले होते, असे आचार्य यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्रसादवर कर्नाटकमध्ये विविध ठिकाणी फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने अनेक लोकांना अशाप्रकारे फसविले आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख