#RamMandir : 'हे' आहेत मंदिराचे रचनाकार 

नागर शैलीत मंदिरांची रचना करण्यात सोमपुरा कुटुंब पारंगत आहे. या कुटुंबाला वास्तुकलेचा वारसा पिढ्यान पिढ्या मिळत आला आहे.
Ram Temple.jpeg
Ram Temple.jpeg

अहमदाबाद : अयोध्येत आज मंदिराच्या भूमिपूजनाने नवीन अध्याय सुरू होत आहे. अनेक वर्षांनंतर भूमिपूजनाचा दिवस उजाडला आहे. हा दिवस पाहण्यासाठी अहमदाबादचे एक कुटुंब खूपच उत्साही आहे. हे कुटुंब दुसरे तिसरे नसून राम मंदिराच्या रचनेशी निगडीत असणारे सोमपुरा कुटुंब आहे. 

अयोध्येत राम मंदिराच्या रचनेवर सर्वात अगोदर काम सोमपुरा कुटुंबाने केले आहे. चंद्रकांत सोमपुरा यांनी १९९० च्या दशकातच मंदिरावर काम सुरू केले होते. चंद्रकांत आता ७७ वर्षांचे आहेत. मंदिर रचनांची परंपरा आता त्यांचे दोन मुले निखिल (वय ५५) आणि आशिष (वय ४९) पुढे चालवत आहेत. निखिल यांच्या मते, पुढची पिढी देखील आता या कामात जोडली गेली आहे. निखिल सांगतात की, गुजरातच्या प्रसिद्ध सोमनाथ मंदिराची पुनर्रचना त्यांचे आजोबा प्रभाशंकर सोमपुरा यांनी केली होती. एवढेच नाही तर पद्मश्रीने सन्मानित असलेले प्रभाशंकर सोमपुरा यांनी शिल्प शास्त्रवर चौदा पुस्तके लिहली आहेत. 

नागर शैलीत मंदिरांची रचना करण्यात सोमपुरा कुटुंब पारंगत आहे. या कुटुंबाला वास्तुकलेचा वारसा पिढ्यान पिढ्या मिळत आला आहे. चंद्रकांत सोमपुरा आता वयोमानामुळे घराबाहेर पडत नाहीत. मात्र त्यांच्या मुलांना मंदिरांच्या रचनेबाबत घरातूनच मार्गदर्शन करत असतात. सोमपुरा कुटुंबाने अक्षरधाम मंदिराव्यतिरिक्त अमेरिका आणि ब्रिटनच्या स्वामीनारायण मंदिरांची रचना देखील केली आहे.

सोमपुरा कुटुंबाच्या मते, १९८९ रोजी अयोध्येत राम मंदिराच्या रचनेवर काम सुरू झाले होते. त्यावेळी चंद्रकांत सोमपुरा यांनी जबाबदारी स्वीकारली होती. विश्‍व हिंदु परिषदेने मंदिराच्या रचनेसाठी संपर्क साधला होता. आजही मंदिराच्या रचनेबाबत विहिंपशी चर्चा होते, असे निखिल आणि आशिष सांगतात. 

वास्तुविशारदमध्ये प्रवीण असणारे कुटुंब मंदिरांची आखणी व रचना करण्यात देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. अहमदाबाद येथील हे कुटुंब पंधरा पिढ्यांपासून मंदिरांची रचना आणि आखणी करत आहे. आतापर्यंत त्यांनी १३१ मंदिरांची रचना तयार केल्याचे सोमपुरा कुटुंबांचे म्हणणे आहे.
Edited  by : Mangesh Mahale

हेही वाचा राममंदिर पूर्ण व्हायला लागणार किमान इतकी वर्षे... 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचे भूमीपूजन झाल्यावर अयोध्येतील रामजन्मभूमीवरील प्रस्तावित भव्य मंदिराची निर्मिती सुमारे 3 वर्षांत पूर्ण होईल. त्यानंतर रामभक्तांना या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झालेल्या श्रीरामाचे दर्शन व पूजाअर्चा करण्याचा योग येईल, अशी आशा विश्‍व हिंदू परिषदेने व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका 2022 मध्ये आहेत व त्यापूर्वीच राममंदिराचे काम पूर्ण करण्याचा सत्तारूढ भाजपचा निर्धार आहे. विहिंपचे केंद्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार यांनी, राममंदिराच्या उभारणीत केवळ सरकारच्या भरोशावर रहाता येणार नाही तर सर्वसामान्यानीही आपापल्या परीने यात वाटा उचलायला हवा, अशी सूचक सूचना केली आहे.  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com