अजितदादा आठवलेंना म्हणाले, "दिल्लीत जाऊन मोदींना एवढचं सांगा.."

मी आठवलेंना तौते चक्रीवादळातील पीडितांना केंद्र सरकारकडून योग्य ती मदत मिळवून द्यावी,अशी विनंती केली.
Sarkarnama Banner - 2021-05-31T161210.558.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-31T161210.558.jpg

मुंबई :  मुंबईतील मेट्रोच्या 2 ए आणि 7 या दोन मार्गिकांचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात शाब्दीक जुगलबंदी रंगली. एमएमआरडीएच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आठवलेंना टोमणे मारले. ramdas athawale should bring help for maharashtra from pm modi says ajit pawar

महाराष्ट्राला काय मदत हवी, अशी विचारणा आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्याकडे केली होती. आठवले म्हणाले,  "अजित पवार यांच्या काय मागण्या आहेत ते त्यांनी सांगावं मी केंद्राकडे तशी मागणी करेन, जीएसटी टप्याटप्याने मिळेल." यावर अजितदादा म्हणाले की, रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री आणि माझ्याशी बोलताना महाराष्ट्राला काय मदत हवी, अशी विचारणा केली. त्यामुळे मी आठवलेंना तौते चक्रीवादळातील पीडितांना केंद्र सरकारकडून योग्य ती मदत मिळवून द्यावी,अशी विनंती केली." 

यावेळी अजित पवार यांनी आठवले यांच्यासमोर काही प्रस्ताव मांडले. तुम्ही महाराष्ट्राला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आता दिल्लीत जाऊन तुम्ही पंतप्रधान मोदी यांना भेटा आणि तौते चक्रीवादळासाठी योग्य ती मदत महाराष्ट्राला द्या, असे सांगा. गुजरातने काहीच मागणी केली नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000 कोटींची मदत जाहीर केली. पण महाराष्ट्राला केंद्राकडून कोणतीही मदत मिळालेली नाही, याकडे अजित पवार यांनी आठवलेंचे लक्ष वेधले.

अजित पवार म्हणाले की, आठवले साहेब, राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. यामध्ये आता केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. काहीजण राज्य सरकारने कर कमी करावा, असा सल्ला देतात.

अजित पवार म्हणाले की पेट्रोल 100 रुपये झालं, लोक आम्हाला सांगतात की राज्य सरकार ने काही करावं,आम्हीही काही टॅक्स लावतो पण केंद्र जास्तच टॅक्स लावत आहे.  साडेतीन ते 4 लाख कोटी केंद्राला मिळतात , त्यावर काही टॅक्स कमी करावा, त्याबाबत काही आंदोलने देखील होत आहे.

राज्यकर्ते हे येतात अन् जातात. जनता त्यांना निवडून देत असते. मात्र, आजपर्यंत केंद्रात कोणाचेही सरकार असले तरी राज्यांना मदत देताना इतका भेदभाव झाला नव्हता किंवा तसे जाणवलेही नसेल. यामध्ये कितपत तथ्य आहे, हे माहिती नाही पण याचा गोष्टीचा विचार होणे गरजेचे आहे, असा टोमणा अजितदादा यांनी आठवलेंना लगावला.  

 Edited by : Mangesh Mahale    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com