मुंबई बत्तीगुल मागे सरकारचा नाकर्तेपणा.. राम कदम यांचा ऊर्जामंत्र्यांना टोला..  - Ram Kadam criticizes Energy Minister Nitin Raut over Mumbai power outage | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई बत्तीगुल मागे सरकारचा नाकर्तेपणा.. राम कदम यांचा ऊर्जामंत्र्यांना टोला.. 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

"घातपाताची शक्यता ? असं म्हणून महाराष्ट्र सरकारला स्वतःची जबाबदारी कशी टाळता येईल ?

मुंबई : मुंबईची वीज खंडीत झाली होती, यामागे घातपाताची शक्यता आहे, असे मत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणी राज्य सरकार चैाकशी समिती नेमणार आहे. केंद्र सरकारकडून याप्रकरणाची चैाकशी होणार आहे, असे नितीन राऊत यांनी सांगितले. याबाबतचे टि्वट राऊत यांनी केलं होत. त्याला भाजपचे ज्येष्ठ नेते राम कदम यांनी राऊत यांच्यावर निशाना साधला आहे.

नितीन राऊत यांच्या टि्वटला राम कदम यांनी उत्तर दिले आहे. राम कदम आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "स्वतःची जबाबदारी झटकत असताना काँग्रेस नेते अपयशाचे सर्व खापर राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माथ्यावर टाकत आहेत हे राष्ट्रवादीला मंजूर आहे का ? मुंबईत वीज जाण्यामागे घातपात असू शकतो ? म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांचं अपयश ?"

"घातपाताची शक्यता ? असं म्हणून महाराष्ट्र सरकारला स्वतःची जबाबदारी कशी टाळता येईल ? कोट्यावधी लोकांची गैरसोय झाली त्रास झाला संपत्ती पासून सर्वच गोष्टीचे नुकसान झालं याला जबाबदार तुमच्या सरकारचा नाकर्तेपणा आहे त्यामुळे उगाच अशी विधाने करून  लोकांची दिशाभूल तुम्हाला करता येणार नाही," असा प्रश्न राम कदम यांनी राऊत यांना टि्वटवरून विचारला आहे. 

रविवारी मुंबईला ग्रीड फेल्युअरचा फटका बसला होता. मुंबईत सकाळपासून वीज गेली होती.  रेल्वे सेवा, रुग्णालये यावर याचा मोठा परिणाम झाला आहे.  केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे, अलिबागलाही याचा मोठा फटका बसला होता.
या घटनेबाबत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नितीन राऊत म्हणाले की रविवारी मुंबईतील वीज खंडीत झाली होती, या प्रकार म्हणजे वीजमंडळाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. महावितरण तांत्रिक पथक याबाबत लवकरच अहवाल देणार आहेत.

मुंबईच्या बत्ती गुलचा फटका बिग बी अमिताभ बच्चन यांनाही बसला होता. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी याबाबत टि्वट केलं होतं ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की मी आपल्याशी डोंगलच्या माध्यमातून संपर्क साधत आहे. सर्वाना माझी विनंती आहे की शांत रहा..संयम पाळा. मुंबईची वीज खंडीत झाल्याने मी पाठवित असलेली पोस्ट समजून घ्या. सर्वांनी शांत राहावे. वीज खंडीत झाल्याने मुंबई परिसरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या या टि्वटवर सेलिब्रेटी आणि त्यांच्या चाहत्यांना प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिग बी यांच्या या टि्वटवर अभिनेता अभिषेक बच्चनने प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेक आपल्या टि्वटमध्ये म्हणतो "सर्व जण इतके हैरान का आहेत. हे 2020 आहे काहीही होऊ शकते." अभिषेकच्या या टि्वटवरही अनेकांना कमेंट केल्या आहेत. त्याचे हे टि्वट अनेकांना शेअर केलं आहे. 
   
ग्रीड फेल्युअरचा परिणाम म्हणून कळवा-पडघा आणि खारघर येथील ट्रान्सफाॅर्मर बंद पडले. त्यामुळे मुंबई व उपनगरांना होणारा वीज पुरवठा बंद झाला. पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेच्या कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची उपनगरी सेवाही बंद झाली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार व त्यांच्या वीज कंपन्या जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख