राजेश टोपे यांचा गैरसमज दूर करणार : अमित देशमुख  - Rajesh Tope misunderstanding will be removed  Amit Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

राजेश टोपे यांचा गैरसमज दूर करणार : अमित देशमुख 

लक्ष्मण सोळुंके  
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

आयसीएमआर या टेस्ट किट्सचा पुरवठा करत आहे. पुढची व्यवस्था होईपर्यंत तेच या किट्सचा पुरवठा करतील असं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे. 

जालना : टेस्ट किट्स या केंद्र सरकारच्या आयसीएमआर संस्थेने निर्धारित केलेल्या पुरवठादाराकडून राज्याला मिळाल्या आहेत. या टेस्ट किट्स खराब निघाल्या आहेत. या किट्स खराब असल्याचा शोध आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागानेच लावला आहे. या टेस्ट किट्सचा पुरवठा आम्ही थांबवला आहे. आता आयसीएमआर या टेस्ट किट्सचा पुरवठा करत आहे. पुढची व्यवस्था होईपर्यंत तेच या किट्सचा पुरवठा करतील असं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलंय. 

सध्या या टेस्ट किट्स खरेदी संदर्भात समिती नेमण्यात आली आहे. लवकरच या संदर्भातील अहवाल येईल. हा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं अमित देशमुख यांनी सांगितलय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वैद्यकिय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या एनआयव्ही संस्थेमार्फत या सदोष किट्स खरेदी करण्यात आल्याचं म्हटलं होतं. हा आरोप अमित देशमुख यांनी फेटाळून लावला आहे. टोपे यांनी खोलवर माहिती न घेता वक्तव्य केल्याचं सांगून त्यांचा गैरसमज दूर करणार असल्याचंही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे.   

संबंधित लेख