#SachinPailot: वसुंधरा राजेंच्या उपस्थितीत आज भाजपची महत्वपूर्ण बैठक...

बैठकीला माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या उपस्थित राहणार आहेत. राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीबाबत त्या भाजपच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.
Vasundhara Raje.jpg
Vasundhara Raje.jpg

जयपूर :  : राजस्थानमध्ये राजकीय उलथापालथ सुरू असताना भारतीय जनता पक्षाने आज सकाळी ११ वाजता जयपूर येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या उपस्थित राहणार आहेत. राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीबाबत त्या  भाजपच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.  सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेसमध्ये अस्थवस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांच्या होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 


भाजपच्या केंद्र पातळीवर याबाबत चर्चा सुरू असून काल भाजपचे वरिष्ठ नेता ओम माथुर हे जयपूर येथे पोहचले आहेत. आजच्या बैठकीत ते सहभागी होण्याची शक्यता आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांची मंगळवारी (ता. 14 जुलै) उपमुख्यमंत्री, तसेच प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. पायलट यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासारा यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. गोविंद सिंह हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय मानले जातात. राजस्थानातील कॉंग्रेसच्या बहुसंख्य आमदारांच्या मागणीनुसार पायलट यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केली. 

राजस्थान विधिमंडळ कॉंग्रेस पक्षाची बैठक काल जयपूरमध्ये झाली. या बैठकीला पक्षाचे 102 आमदार उपस्थित असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. याच बैठकीत पक्षविरोधी कारवाई करणारे उपमुख्यमंत्री पायलट यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी बहुसंख्य आमदारांनी केली होती. नवे प्रदेशाध्यक्ष डोटासारा हे राजस्थानाच्या सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. राजस्थानच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या जाट समाजाचे ते प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी राजस्थानच्या विश्‍वविद्यालयात बीकॉम आणि एलएलबीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

जाट समाज हा भारतीय जनता पक्षाचा पारंपारिक मतदार समजला जातो. त्याच समाजातील गोविंद सिंह यांच्या हाती राजस्थान कॉंग्रेसची धुरा सोपविण्यात आली आहे.  राजस्थान काँग्रेसच्या मुख्यालयातील सचिन पायलट यांच्या पोस्टर काढून त्या ठिकाणी गोविंद सिंह यांचे पोस्टर लावण्यात आले आहे. 

राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची आज पक्षाने उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे, अशी माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. पायलट यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. राजस्थानमधील फसलेल्या बंडानंतर अखेर पायलट यांनी जाहीरपणे काल भावना व्यक्त केल्या आहेत.

'सत्याला त्रास दिला जाऊ शकतो मात्र, पराभूत केले जाऊ शकत नाही,' असे पायलट यांनी काल हकालपट्टीनंतर ट्विटरवर म्हटले आहे. यावर पायलट यांच्या समर्थकांनी  ट्विटरवर त्यांची बाजू घेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले आहे. गेहलोत यांनी पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन दूर केले आहे, याचा सूड ते गेहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवून घेतील, असे एका पायलट समर्थकाने म्हटले आहे. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com