फोन टॅपिंगमुळे पुन्हा एकदा गेहलोत-पायलट वादाची ठिणगी

राजस्थामध्ये केंद्रीय मंत्री व काँग्रेसच्या आमदारांच्या फोन टॅपिंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Rajastan political crisis Ashok Gehlot govt admits to phone taps
Rajastan political crisis Ashok Gehlot govt admits to phone taps

नवी दिल्ली : राजस्थामध्ये केंद्रीय मंत्री व काँग्रेसच्या आमदारांच्या फोन टॅपिंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सरकारच्या विधीमंडळाच्या संकेतस्थळावरच फोन टॅपिंग झाल्याची कबुली देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत अडचणी सापडले आहे. मागील वर्षी आमदार सचिन पायलट यांच्या समर्थकांचे फोनही टॅप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून पायलट समर्थकांनी गेहलोत यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे समजते. 

मागील वर्षी जुलै महिन्यात फोन टॅपिंगची बाब समोर आली होती. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राजस्थानचे पर्यटन मंत्री विश्वेंद्रसिंह आणि आमदार भंवर लाल शर्मा यांच्यासह अन्य काही जणांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. त्यांच्या फोनवरून झालेल्या संभाषणाच्या अॉडिओ क्लीप व्हायरल झाल्या होत्या. त्याआधारे पोलिसांनी शेखावत यांच्यासह इतरांवर गुन्हाही दाखल केला होता. सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 

गेहलोत यांनी त्यावेळी फोन टॅपिंगचा आरोप खोडून काढला होता. सरकारला वाचविण्यासाठी मी खोट्या क्लीप तयार करणार नाही. हे सिध्द झाल्यास मी राजकारणातून बाहेर पडेल, असे आव्हान गेहलोत यांनी दिले होते. त्यावेळी काँग्रेस सरकार कोसळणार असल्याची चर्चा होती. आमदार सचिन पायलट बंडाच्या पवित्र्यात होते. 

भाजपचे आमदार कालीचरण सराफ यांनी फोन टॅपिंगबाबत विधीमंडळासमोर प्रश्न उपस्थित केला होता. त्याचे उत्तर काही महिन्यांनी देण्यात आले आहे. राजस्थान पोलिसांनी फोन टॅपिंग केल्याचे यामध्ये मान्य करण्यात आले आहे. पण त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून मान्यता घेण्यात आली होती, असेही त्यात स्पष्ट केले आहे. लोकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने काही धोका असल्याचे दिसल्यास फोन टॅपिंग केले जाते. त्यासाठी इंडियन टेलिग्राफ अॅक्टमधील तरतुदीनुसार संबंधित अधिकाऱ्याची परवानगी घेतली जाते, असेही नमुद करण्यात आले आहे.

भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका

राजस्थानमधील राजकारण आता तापले आहे. भाजपचे नेते राजवर्धन राठोड यांनी गेहलोत सरकारवर टीका केली आहे. सरकारने टेलिग्राफ कायद्याचा गैरवापर केला आहे. त्यांनी विधीमंडळामध्ये फोन टॅपिंग केल्याचे मान्य केले आहे. त्यावेळी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना गेहलोत यांनी फोन टॅपिंग झाले असेल तर मी राजीनामा देईल, असे म्हटले होते. राजकीय फायद्यासाठी गैरवापर केल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे.

काँग्रेसचा पलटवार

राजस्थानचे मंत्री प्रताप सिंह खचारियावस यांनी पलटवार केला आहे. भाजपने कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडले. राजस्थानचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केला. आता भाजपचे नेते फोन टॅपिंगचे प्रकरण पुढे करून राजीनाम्याची मागणी करत आहेत. सरकारने खासदार किंवा आमदारांचे फोन टॅप केले नाहीत. पण ज्या अॉडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत, त्याबाबत संबंधितांनी खुलासा करावा. यातील आवाज आपला नसल्याचे त्यांनी जगाला सांगावे, असा पलटवारही त्यांनी केला आहे. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com