हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या येणं कमी झालेलं नाही!

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचेनाव घेत राज ठाकरे यांनी थेट टीका केली.
Sarkarnama (42).jpg
Sarkarnama (42).jpg

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे Balasaheh Thackeray memorial नाव घेत थेट टीका केली.  बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर सरकारकडून कामे करुन घेण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नसल्याची टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

''जुन्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या येणं काही कमी झाल्याचे दिसत नाही. सरकारकडून कामे करुन घेण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या कमी झालेल्या नाहीत. कुठेच काही कमी झालेलं नाही, तर या सणांवरच बंदी का घातली जाते?  असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.  

 'मंदिरे सुरू करा,' अशी मागणी लावून धरत मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी ठाकरे सरकारच्या Uddhav Thackeray विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ''मंदिर उघडली पाहिजे,'' यासाठी मनसेकडून लवकरच घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला. 

''सरकारला जनआशीर्वाद यात्रा, मेळावे चालतात, पण सण आला की लॉकडाऊन करतात, 'लॉकडाउन आवडे सरकारला' अशी परिस्थिती सरकारची झाली आहे. सगळ्यांना नियम सारखे लावा, एकाला एक दुसऱ्याला दुसरा नियम असं चालणार नाही.  शिवसेना विरोधात असती तर त्यांनी काय केलं असते. 'ते' घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात. तर आम्ही काय करणार,'' असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.  

''दहीहंडी साजरी करण्याचे मनसेच्या कार्यक्रर्त्यांना मीच सांगितलं. दहीहंडीवर बंदी घालणे, मंदिरं बंद ठेवणं हे सूडबुद्धीने सुरू आहे. नारायण राणे यांच्या घरासमोर हाणामारी सुरू, मेळावे सुरू, भास्कर जाधव च्या मुलांसाठी मंदिर उघडी आहेत, क्रिकेट, फुटबॉल सगळं सुरू आहे, तुम्ही वाट्टेल त्या गोष्टी करायच्या, आम्ही दहीहंडी साजरी करायची नाही,'' असा संतप्त सवाल ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.

राज ठाकरे म्हणाले, ''अनाधिकृत फेरीवाल्यांची मस्ती उतरवली पाहिजे. एका महिला अधिकाऱ्याची बोटं छाटली जातात, याचा नुसता निषेध करुन चालणार नाही. इतक्या वर्षात कुणाची हिंमत झाली नाही बोटं छाटायची. सरकारी अधिकाऱ्याची बोटं छाटण्याची हिंमत कशी होते ? ज्यादिवशी हल्लेखोर पोलिसांच्या तावडीतून सुटणार तेव्हा त्यांना मनसे चोपणार,''
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com