मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत राज ठाकरेंचा करिष्मा चालणार  - Raj Thackeray has started preparations for the municipal elections  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत राज ठाकरेंचा करिष्मा चालणार 

ज्ञानेश सावंत 
शुक्रवार, 16 जुलै 2021

विधानसभा निवडणुकात मनसेचा पडझड आणि सलग दोन निवडणुकांत प्रत्येकी एक आमदार निवडून आला.

मुंबई : राजकीय पटलावर अडखळलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) इंजिन रुळावर आणून ते सुसाट करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची धडपड सुरू झाली असली; महापालिकांच्या निवडणुकांत मनसेला नाशिक, पुण्यात उभारी मिळण्याची शक्यता कमी असून, मुबंई, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत राज यांचा करिष्मा चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महापालिकांत मनसेच्या नगरसेवकांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी आपले दौरे हे निवडणुकांची तयारी आहे का, यावर निवडणुकांना वेळ असल्याचे सांगून राज यांनी आपली 'स्ट्रॅटेजी' गुलस्त्यातच ठेवली. (Raj Thackeray has started preparations for the municipal elections) 
 
याआधी निवडणुकांत म्हणजे २०१२ आणि त्यापूर्वी भारतीय जनता पक्षाची ताकद नसल्यानेच नाशिक, पुण्यात मनसेला मतदारांची पसंती मिळाली. परंतु, या आणि अन्य महापालिकेत भाजपच सत्ताधिश असल्याने मनसेची ताकद वाढू शकत नसल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे, मुंबई आणि या पट्ट्यातील काही महापालिकांत भाजप मनसे एकत्र आल्यास मनसेला विस्तारण्यास वाव मिळणार असल्याचेही राजकीय जाणकार सांगत आहेत.

हेही वाचा : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसची नव्हे तर भाजपची मते फुटतील!

मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्या एक-दोन निवडणुकांत या पक्षाची ताकद वाढली; विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले. त्यानंतर महापालिका निवडणुकांतही राज यांच्यावर लोकांनी विश्वास ठेवून, नाशिकची सत्ता दिली आणि पुण्यात विरोधी बाकांवर बसविले. त्याशिवाय, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पिंपरी-चिंचवडमध्ये राज यांचे कार्यकर्ते नगरसेवक झाले. राज यांचे शिलेदार चमकदार कामगिरी करण्याची आशा त्या-त्या शहरांत फोल ठरल्याने पुढच्या निवडणुकांत म्हणजे, २०१७ मध्ये पुण्यात मनसेचा दारुण पराभव झाला आणि नाशिकमधील सत्ता गेली. 
इतर शहरातही पडझड झाली. 

विधानसभा निवडणुकात मनसेचा पडझड आणि सलग दोन निवडणुकांत प्रत्येकी एक आमदार निवडून आला. सततच्या पराभवामुळे मनसेचे खच्चीकरण होत गेले आणि मनसे, राज यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला. नव्या बदललेल्या राजकीय घडामोडी पाहता राज पुन्हा सक्रिय होत असल्याचे दिसत आहे. ते आपल्या पूर्वीच्या नाशिक, पुणे शहरात लक्ष केंद्रीत करण्याच्या तयारी आहेत. त्यातून राज यांनी आपला मुक्काम दोन्ही शहरांत हलविला. मनसेच्या सततच्या पराभवाला पाच वर्ष झाली; तरी मावळलेली मनसे कधी उगवणार कधी, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. 

भाजप-मनसे या राजकीय समीकरणांची अटकळ बांधली जात आहे 

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत राज यांनी भाजपविरोधात राज्यभर प्रचार करीत, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेव्हाचे पक्षाध्यक्ष अमित शहांना देशाच्या राजकीय पटलावरून हाकलून देण्याची हाक दिली. त्यामुळे राज यांच्या चांगल्याच गाजल्या. त्यानंतर मात्र, राज यांची 'ईडी' ने चौकशी केल्यानंतर राज यांची भूमिका बदली आणि भाजप, मोदी, शहांबाबत ते मवाळ झाल्याचे पाहायला मिळाले. या नव्या भूमिकेतूनच मनसे आणि भाजप हे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावरून दोन्ही पक्षांकडून दुजोरा मिळालेला नाही. मात्र ही शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई आणि या भागांतील काही महापालिका भाजप-मनसे या राजकीय समीकरणांची अटकळ बांधली जात आहे. 

हेही वाचा : आघाडी सरकारच्या विरोधात आता सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार

शिवसेनेला फटका बसला

महापालिकांच्या २०१२ च्या निवडणुकांत ज्या भागांत मनसेची ताकद तिथे भाजपचे वर्चस्व आहे, त्यात पुणे, नाशिक, मुंबई, पिंपरी-चिंचवड महापालिकांचा समावेश आहे. शिवसेना-भाजपची युती असताना मनसेच्या उमेदवारांमुळे भाजपचे नुकसान झाल्याचे राजकीय जाणकार सांगत आहे. त्यानंतर काही प्रमाणात शिवसेनेलाही फटका बसला. परंतु, गेल्या काही वर्षात शिवसेना भाजपाची ताकद वाढल्याने मनसेपुढे मर्यादा असल्याचेही बोलले जात आहे. 

निवडणुका म्हणून नव्हे तर राज्यातील लोकांना न्याय देऊन, त्यांच्यासाठी पर्यायी राजकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्व निवडणुका मनसे स्वबळावर लढेल. त्याची तयारी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरू केली आहे. त्यासाठी संघटना विस्तार करीत आहोत, असल्याचे मनसेचे सरचिटणीस किशोर शिंदे यांनी सांगितले.   

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख