राहुल गांधी पोलिसांना म्हणाले, "" हाथरसला मला एकट्याला पायी चालत जावू द्या !''  - Rahul Gandhi told the police, "Let Hathras walk alone!" | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधी पोलिसांना म्हणाले, "" हाथरसला मला एकट्याला पायी चालत जावू द्या !'' 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

नोअडाचे एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले, की राहुल गांधींची गाडी पोलिसांनी थांबवली.

हाथरस(यूपी) : "" हाथरसला मला एकट्याला चालत जायचे आहे. मला जावू द्या! तुम्ही मला एक सांगा की कोणत्या कायद्याखाली अटक करीत आहे.'' 

त्यावर पोलीस म्हणाले, "" आम्ही तुम्हाला कलम188 आपीसी अंतर्गत अटक करीत आहोत. कारण आपण कायद्याचे उल्लंघण करीत आहात. पोलिसांना राहुल हे विनंती करीत होते की मला एकट्याला जावू द्या कारण मला हाथरसमधील पिडित मुलीच्या आईवडीलांची भेट घ्यायची आहे पण, पोलिसांनी त्यांना तेथे जाण्यास परवानगी दिली नाहीत त्यांना अटक करण्यात आली आहे. 

हाथरसप्रकरणी यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारवर टीका होत असून कॉंग्रेस, समाजवादी पक्षासह बसपाने या घटनेच्या तीव्र शब्दात निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री मायावती यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे आज हाथरसकडे रवाना झाले खरे मात्र, कोरोना कायद्याचे उल्लंघन केल्याचे कारण देत त्यांना हाथरसकडे जाण्यास पिोलसांनी मज्जाव केला. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. 

नोअडाचे एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले, की राहुल गांधींची गाडी पोलिसांनी थांबवली. त्यानंतर राहुल गाडीतून उतरत पोलिसांना म्हणाले, की मला एकट्याला हाथरसला जावू. मी चालत जातो. तरीही पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही. कलम 188 अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. 
पोलिसांनी आपल्याला हाथरसकडे जावू दिले नाहीत तसेच पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

हाथरस घटनेनंतर योगी सरकारने हाथरस परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढविला असून कोणालाही तेथे सोडण्यात येत नाही. या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट आहे. राहुल गांधींना पोलिसांनी अटक केली आहे. राहुल यांच्याप्रमाणे प्रियंका गांधीही हाथरसकडे रवाना झाल्या आहेत त्यांच्या गाड्याही युमना हायवेवर रोखण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, समाजवादी पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ हाथरसमध्ये आंदोलन केले. सर्वच पक्ष आणि संघटनांची एकच मागणी आहे, नराधमांना फासावर लटकवा तरच पिडित युवतील न्याय मिळेल. 

तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून यूपी पोलिसांनी तातडीने स्पष्टीकरण देण्याच्या सूचना केल्या आहेत. 

राहुल गांधी यांनी तर योगी सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेत राष्ट्रीय महिला आयोगाने तातडीने यूपीच्या पोलीस महासंचालकांना पत्र पाठविले आहे. या पत्रात आयोगाने म्हटले आहे, की पिडित युवतीवर अंत्यसंस्कार मध्यरात्री करण्यात आले आहेत. तिच्या नातेवाईक अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नव्हते. हा जो आरोप केला जात आहे त्याबाबत तातडीने स्पष्टीकरण द्यावे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख