Rahul gandhi criticise PM narendra modi over mann ki baat
Rahul gandhi criticise PM narendra modi over mann ki baat

सिस्टम फेल! आता 'जन की बात' करणं महत्वाचं...

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून देशवासियांशी संवाद साधला.

नवी दिल्ली : देशात सध्या करोनाचा संसर्ग अतिशय झपाट्याने वाढत आहे. दररोज लाखांचा घरात नवीन रूग्ण आढळून येत असून रूग्णांच्या मृत्यू संख्येही मोठी भर पडत आहे. केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी देखील रूग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. यापार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून देशवासियांशी संवाद साधला. 

पंतप्रधान मोदी यांच्या मन की बातवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ट्विट करून ते म्हणाले, सिस्टम फेल आहे, म्हणून आता ‘जन की बात’ करणे आवश्यक आहे. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. माझी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना विनंती आहे की, त्यांनी सर्व राजकीय कामं सोडून केवळ लोकांना मदत करावी, देशवासियांचं दुःख दूर करा. काँग्रेस परिवाराचा हा धर्म आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहूल गांधी यांनी यापूर्वीही केंद्र सरकारवर टीका आहे. कोरोनाशी लढताना सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी वारंवार म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज 'मन की बात'मध्ये कोरोना संकट देशाची कठीण परीक्षा घेत असल्याचे म्हटले आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर देशात आत्मविश्वास निर्माण झाला होता. पण या वादळाने देशाला हादरवून टाकलं आहे. या संकटाचा सामना करताना आपल्याला तज्ज्ञांच्या मतांना प्राधान्य द्यायचे आहे. या संकटकाळात लशीचे महत्वही अधोरेखित झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 

पंतप्रधान म्हणाले, मी नागरिकांना आवाहन करतो की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्व राज्यांना मोफत लस पाठविली जात आहे. त्याचा फायदा 45 वर्षांवरील नागरिकांना होत आहे. मोफल लशीचा कार्यक्रम यापुढेही सुरू राहील. देशात 1 मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत असून त्यामध्ये 18 वर्षापुढील लोकांना लस दिली जाईल. या लढाईमध्ये केंद्र सरकार राज्यांना सर्वप्रकारे मदत करत आहे. 

आज देशातील वैद्यकीय क्षेत्रातील लोक आणि फ्रंटलाईन वर्कर्स सेवा करत आहेत. अनेक लोकही या सेवेमध्ये मागे नाहीत. लोक पुढे येत आहे. कोरोना वाढू नये यासाठी अनेक युवक आणि स्थानिकांच्या मदतीने प्रयत्न केले जात आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

Edited By Rajanand More


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com