हाथरसला निघालेल्या राहुल गांधींना अटक, पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप  - Rahul Gandhi arrested on his way to Hathras, accused of being beaten by police | Politics Marathi News - Sarkarnama

हाथरसला निघालेल्या राहुल गांधींना अटक, पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

पोलिसांनी आपल्याला हाथरसकडे जावू दिले नाहीत तसेच पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

नवी दिल्ली : हाथरसप्रकरणी यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारवर टीका होत असून बसपच्या नेत्या मायावती यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी हे आज हाथरसकडे रवाना झाले खरे मात्र, कोरोना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. 

नोअडाचे एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले, कीकोरोनाच्या पार्श्वभूमी सरकारने जे नियम घालून दिले आहेत त्याचे उल्लंघन केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. 
पोलिसांनी आपल्याला हाथरसकडे जावू दिले नाहीत तसेच पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

तसेच समाजवादी पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ हाथरसमध्ये आंदोलन केले. सर्वच पक्ष आणि संघटनांची एकच मागणी आहे, नराधमांना फासावर लटकवा तरच पिडित युवतील न्याय मिळेल. 

दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून यूपी पोलिसांनी तातडीने स्पष्टीकरण देण्याच्या सूचना केल्या आहेत. 

हाथरसमध्ये झालेल्या दलित युवतीवरील बलात्कारानंतर प्रियंका गांधी यांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून त्यांनी योगी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्या हाथरसमध्ये पिडित मुलीचे आईवडील भाऊ आणि नातेवाईकांची भेट घेणार आहेत. या धक्कादायक घटनेनंनतर हाथरस आणि परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

हाथरसमधील युवतीवर पाच नराधमांनी बलात्कार करून तिचा मारहाण केली होती. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्या युवतीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तिचा मृतदेह गावात आणला पण, पोलिसांनी तिच्या आईवडीलांना आणि नातेवाईकांना विश्वासात न घेता परस्पर अंत्यसंस्कार केल्याने संताप व्यक्‍त केला जात आहे.

पोलिसांचे म्हणणे असे आहे, की त्यांच्या नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले तर मुलीचे आईवडील म्हणतात आमच्या मुलीचा साधा चेहराही आम्ही पाहू शकलो नाही. माध्यमांनीही या घटनेवरून प्रशासनाला काही प्रश्‍न विचारले आहेत. या घटनेचे जे व्हिडिओ पुढे आले आहेत त्यावरून प्रशासन आणि पोलीस खाते तोंडघशी पडल्याचे दिसून येत आहे. 

राहुल गांधी यांनी तर योगी सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेत राष्ट्रीय महिला आयोगाने तातडीने यूपीच्या पोलीस महासंचालकांना पत्र पाठविले आहे. या पत्रात आयोगाने म्हटले आहे, की पिडित युवतीवर अंत्यसंस्कार मध्यरात्री करण्यात आले आहेत. तिच्या नातेवाईक अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नव्हते. हा जो आरोप केला जात आहे त्याबाबत तातडीने स्पष्टीकरण तातडीने द्यावे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख