पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे जिल्हा ठरणार निर्णायकी   - Pune district will be the deciding factor in the Pune graduate constituency | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे जिल्हा ठरणार निर्णायकी  

उत्तम कुटे
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदारसंख्येत ६१ हजार ८८६ नव्या मतदारांची भर पडली आहे.

पिंपरी : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदारसंख्येत ६१ हजार ८८६ नव्या मतदारांची भर पडली आहे. त्यातील बहुतांश म्हणजे जवळजवळ ८३ टक्के एवढ्या विक्रमी संख्येने मतदार पाचपैकी एकट्या पुणे जिल्ह्यात वाढले आहेत. या मतदारवाढीचा फायदा आपल्यालाच होणार असल्याचा दावा भाजपने केला आहे.

पुणे पदवीधरचे दोन्ही प्रमुख उमेदवार (भाजपचे संग्राम देशमुख व राष्ट्रवादीचे अरुण लाड)हे सांगली जिल्ह्यातील आहेत. मात्र, त्यांचे भवितव्य निश्चीत करण्यात आणि पुणे पदवीधरच्या विजय, पराजयात, मात्र पुणे जिल्हा निर्णायकी ठरणार असल्याची चिन्हे यावेळी दिसत आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूरसाऱख्या महापालिकांत भाजप सत्तेत आले. तर, ग्रामीण भागात राष्ट्रवादी मजबूत आहे. दुसरीकडे शिक्षित मतदारसंघांतही मतदानाचा टक्का कमी आहे. त्यामुळे शहरी वा ग्रामीण कुठला मतदार आपला हक्क अधिक बजावतो, त्याला मतदानासाठी कोण बाहेर काढते, यावर निकाल फिरणार आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १२ नोव्हेंबरपर्यत पुणे पदवीधरमधील मतदारांची संख्या ही तीन लाख ६५ हजार ३५८ वरून चार लाख २६ हजार २४४ वर गेली आहे. त्यात एकट्या पुणे जिल्ह्याचा वाटा १ लाख ३६ हजार ६११ एवढा आहे. त्यानंतर कोल्हापूर व सांगलीचा नंबर लागतो. वाढलेल्या १९ इतर  मतदारांतही सर्वाधिक म्हणजे १४ हे पुणे जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे पुणे पदवीधरच्या मागच्या मतदारयादीमध्ये मतदारसंख्येत तीनवर असलेला पुणे जिल्हा आता एक नंबरवर आला आहे. तर, मतदारसंघातील दोन्ही प्रमुख उमेदवार असलेला सांगली तिसऱ्या नंबरवर कायम राहिला आहे. मतदारसंघात जेवढ्या महिला मतदार आहेत, त्यापेक्षा अधिक मतदार हे पुणे जिल्ह्यात आहेत. एकूणच महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत खूप कमी आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी मतदार आहेत. ती एकूण संख्या पुणे जिल्ह्यातील महिला मतदारांच्या थोडी अधिक आहे.

जिल्हा-पुरुष मतदार- महिला मतदार- इतर मतदार- एकूण मतदार
पुणे-८९६२६-४६९५८-१४-१३६,६११
सातारा - ३९,३९७-१९६१७-१- ५९,०७१
सांगली - ५७६५९- २९६६१-३- ८७२३३
सोलापूर -४२०७० -११,७४२-९०- ५३,८१३
कोल्हापूर- ६२,७०९- २६८२०- ०- ८९५२९
एकूण - २,९१,३७१ - १,३४,८५४ - १९ -४,२६,२४४
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख