प्रियंका गांधी यांचा सरकारी बंगला भाजपच्या 'या' खासदारांना मिळणार...

केंद्र सरकारने प्रियंका गांधी यांना एक पत्र लिहिले आहे. येत्या एक ऑगस्टपर्यंत त्यांनी हा बंगला रिकामा करावा, असे या पत्रात म्हटले आहे.
0Priyanka_gandhi_0.
0Priyanka_gandhi_0.

नवी दिल्ली : लोधी इस्टेटमधील सरकारी बंगल्यात 23 वर्षापासून राहत असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना हा बंगला रिकामा करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. याबाबत केंद्र सरकारने प्रियंका गांधी यांना एक पत्र लिहिले आहे. येत्या एक ऑगस्टपर्यंत त्यांनी हा  बंगला रिकामा करावा, असे या पत्रात म्हटले आहे. 

प्रियांका गांधी यांना लोधी इस्टेटमधील हा बंगला 21 फेब्रुवारी 1997 रोजी देण्यात आला होता. प्रियांका गांधी यांना हा बंगला रिकामा करण्याच्या सूचना नियमाच्या आधारेच देण्यात आल्या आहेत. लखनऊमधील 'कौल हाउस' याठिकाणी प्रियांका शिफ्ट होणार असल्याचे समजते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मामी शीला कौल यांचे हे 'कौल हाउस' आहे.  भाजपचे राज्यसभा खासदार आणि मीडिया सेल प्रमुख अनिल बलूनी यांना हा बंगला देण्यात येणार असल्याचे समजते. केंद्र सरकारने यापूर्वी प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेतला होता. 

ज्या व्यक्तीकडे एसपीजी सुरक्षा आहे, त्यांनाच हा सरकारी बंगला देण्यात येतो, असा केंद्र सरकारचा नियम आहे. त्यामुळे  या नियमाच्या आधारेच प्रियांका यांना हा बंगला रिकामा करण्याचे निर्देश दिले आहेत. गांधी कुटुंबियांना सध्याच्या परिस्थितीमध्ये सुरक्षेची आवश्यकता नाही, या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारने त्यांची एसपीजी सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेतला होता. 21 मे 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली होती. तेव्हापासून गांधी कुटुंबियांना एसपीजी सुरक्षा देण्यात येत होती. लोधी इस्टेटमधील 6-बी हाउस नंबर- 35 या बंगल्यात गेल्या दोन दशकापासून प्रियांका गांधी राहत आहेत. त्यांनी आता हा बंगला सोडण्याची तयारी केली आहे.  

हेही वाचा : अहो आश्‍चर्यम... शिवसेना - भाजपची युती झाली!  
 
भिवंडी : राज्यात एकमेकांविरोधात दंड थोपटणारे शिवसेना-भारतीय जनता पक्ष भिवंडी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीत मात्र एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेकडे महाविकास आघाडीमुळे पक्षीय बलाबल जास्त असूनही शिवसेनेने भाजपशी घरोबा करत बिनविरोध निवडणूक पार पाडली.शिवसेने सभापतिपद आपल्याकडे ठेवले असले तरी उपसभापतिपद भाजपला सोडले आहे. सभापतिपदी शिवसेनेचे विकास अनंत भोईर यांची, तर उपसभापतिपदी भाजपचे जितेंद्र श्‍याम डाकी यांची वर्णी लागली आहे. शिवसेना भाजपच्या युतीमुळे दोन्ही पक्षांकडून एक एक अर्ज आला असल्याने पिठासन अधिकारी तथा तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. त्यानंतर भाजप, शिवसेनेच्या सदस्यांनी एकमेकांची गळाभेट घेऊन जल्लोष करीत शुभेच्छा दिल्या. भाजपचे खासदार कपिल पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी एकत्रितपणे येऊन ही विचारांची युती केल्याचे सांगितले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com