स्मृती इराणींच्या विरोधात प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात...

राहुल गांधी यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी बहिण प्रियंका गांधी यांनी जोरदार तयारी केली आहे.
Sarkarnama - 2021-09-15T115851.071.jpg
Sarkarnama - 2021-09-15T115851.071.jpg

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षानी जोरदार तयारी करण्यास सुरवात केली आहे.  कॉग्रेसने आपली रणनिती आखायला सुरवात केली आहे. कॉग्रेस महासचिव आणि उत्तरप्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी (priyanka gadhi) या अमेठी (Amethi) किंवा रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  कॉग्रेसच्या राजकीय सल्लागार समितीमधील एका सदस्याने ही माहिती दिली. 

विधानसभेबरोबरच २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसंदर्भातही कॉग्रेसची तयारी सुरु असल्याचे समजते. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी बहिण प्रियंका गांधी यांनी जोरदार तयारी केली आहे. प्रियंका गांधी यांनी उत्तरप्रदेशातून अमेठी किंवा रायबरेलीतून निवडणूक लढविणायाचा सल्ला निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी प्रियंका यांना दिला असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रियंका गांधी यांचा अमेठी आणि आगामी निवडणुकीबाबतचा दैारा आणि बैठकांमधून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहे.  

महिला आयोग अध्यक्षपद‌ासाठी 'राष्ट्रवादी'च्या चाकणकर, चव्हाण यांच्या नावाची चर्चा 
कॉग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी सांगितले की, प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशमधील कॉग्रेसचा चेहरा असल्याचे म्हटलं आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषीत केलं जाऊ शकते. असेही सलमान खुर्शीद  सांगितलं.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठक्कर देण्यासाठी प्रियंकांना पुढे केलं जाऊ शकतं. प्रियंका या नेहमीच योगी आदित्यनाथ यांच्यावर टि्वटच्या माध्यमातून हल्लाबोल करीत असतात. 

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनंतर या मुख्यमंत्र्यांवर संक्रांत? असंतुष्ट भाजप नेत्यांना यश 
नवी दिल्ली :  गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरुन विजय रूपाणी यांना हटविण्यात आल्यानंतर आता भाजपने हिमाचल प्रदेशाचे  (Himachal Pradesh) मु्ख्यमंत्री जयराम ठाकूर (Jairam Thakur) यांना तातडीने  बोलावून घेतले आहे.  हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याविरूद्ध प्रदेश भाजपमध्ये नाराजी तीव्र आहे. राज्यात भाजपने नुकतीच जी आशीर्वाद यात्रा काढली त्यापासून मुख्यमंत्र्यांना दूर ठेवण्यात आल्याची माहिती मिळते. नाराजीची ही धग दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात असंतुष्ट भाजप नेत्यांना यश आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com