पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचे त्या पत्रावर मौन - prithviraj, mukul wasnik and deora keep silence on that letter | Politics Marathi News - Sarkarnama

पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचे त्या पत्रावर मौन

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

काॅंग्रेसमधील त्या 23 नेत्यांच्या पत्रावरून झालेला गोंधळ सध्यापुरता निवळला आहे. 

मुंबई :  देशातील परिस्थिती लक्षात घेता सोनिया गांधी यांनी पक्षाची जबाबदारी आणखी काही काळ स्वीकारावी किंवा ते शक्य नसल्यास राहुल गांधी यांनी सर्व व्यवधाने बाजूला ठेवून पुन्हा पूर्ण वेळ अध्यक्ष व्हावे, अशी विनंती त्या पत्रात करण्यात आली असल्याचे समजते.

आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात लिहिण्यात आलेल्या या पत्रात गांधी घराण्याविरोधात कोणतीही भूमिका घेतलेली नसून ते पक्षाच्या वाटचालीबद्दल सूचना करणारे पत्र असल्याचे सांगण्यात येते आहे. या पत्राला हेतुपुरस्सररित्या पाय फोडण्यात आल्याची काहीजणांची भूमिका आहे.

पक्ष नेतृत्वाबद्दल कोणतेही मतभेद नसल्याचा निर्वाळा... #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews...

Posted by Sarkarnama on Monday, August 24, 2020

कार्यकारीणीची बैठक व्हावी अशी मागणी करण्यात आली होती पण त्यापूर्वी पत्रातील आशय विकृत स्वरुपात माध्यमांना पाठवण्यात आल्याचेही सांगण्यात येते आहे. मिलिंद देवरा, मुकुल वासनिक आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे तिघेही गांधी घराण्याच्या जवळचे नेते आहेत ,त्यांनी आज या विषयावर पूर्णत: मौन बाळगले असले तरी त्यांच्या समर्थकांनी निष्ठेसंबंधी आरोप होणे दुर्दैवी असल्याची भूमिका घेतली आहे.

हे पत्र या मंडळींनी स्वत:च माध्यमांपर्यंत पोहोचवावे अशी माहिती देण्यात आली. सध्या फिरणारे पत्र हे सत्य आहे काय ते तपासून पहावे लागेल असेही सांगण्यात येते आहे. राहुल गांधींशी संपर्क असलेल्या काही नेत्यांनी या पत्राचा विपर्यास केल्याची  माहितीही आज या संदर्भात चर्चेत होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख