मोठ्या भावाकडून लहान भावाला वाढदिवसाच्या ‘सुचक' शुभेच्छा

भविष्यात पुन्हा एका तुटलेली युती होण्याचे संकेत मिळत असल्याची देखील चर्चा शुभेच्छा संदेशामुळे शिवसेना भाजपा नेते आणि कार्यकर्त्यामध्ये होऊ लागल्या आहेत.
2Narendra_20Modi_20_20Uddhav_20Thackeray.jpg
2Narendra_20Modi_20_20Uddhav_20Thackeray.jpg

पुणे  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भविष्यातील सुचक शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांमुळे शिवसेना भाजपामधील वाढलेले अंतर कमी होण्याची चर्चा होऊ लागली असून, भविष्यात पुन्हा एका तुटलेली युती होण्याचे संकेत मिळत असल्याची देखील चर्चा शुभेच्छा संदेशामुळे शिवसेना भाजपा नेते आणि कार्यकर्त्यामध्ये होऊ लागल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना मराठीमध्ये पत्र पाठवून शुभेच्छा संदेश दिला आहे. हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट केले आहे. या संदेशामध्ये पंतप्रधान म्हणतात, "वाढदिवस हा गतकाळच्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो. त्याचबरोबर हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्याची रुपरेषा निश्‍चित करण्याची. मला विश्‍वास आहे कि आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पवृद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल." "आपल्या वाढदिवसानिमित्त ईश्‍वराकडे हिच प्रार्थना करेन कि, त्याने आपल्याला आनंदी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य द्यावे."

पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छांप्रती धन्यवाद देताना मुख्यमंत्र्यांनी, "आपले प्रेरणादायी शब्द मला व्यक्तिश: व राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील. असे म्हणत ट्वीटर द्वारे आभार मानले आहेत. आभार संदेशात मुख्यमंत्री म्हणतात," माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे. आपले प्रेरणादायी शब्द मला व्यक्तिश: व राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील. पुढील काळात देशाच्या उन्नतीमध्ये महाराष्ट्राचे भरीव योगदान असावे यासाठी आपले मार्गदर्शन आम्हाला लाभत राहील याचा पूर्ण विश्वास वाटतो."

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा देताना वाढदिवस म्हणजे एक संधी असते भविष्याच्या रुपरेशा निश्‍चित करण्याची असे म्हणत भविष्यातील रुपरेषा निश्‍चित करण्याचा मोठ्याभावाच्या नात्याने सल्ला दिला आहे. या सल्ल्याला देखील राजकीय अर्थ निघत असून, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेली अनेक वर्ष अभेद्य असलेली शिवसेना भाजापाची युती २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरुन झालेल्या वादामुळे तुटली. यानंतर शिवसेने कट्टर राजकीय वैचारिक विरोधक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रीय कॉंग्रेस सोबत सत्ता स्थापन केली. या सत्ता स्थापनेनंतर विरोधी पक्षात गेलेला भाजपा मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. या सगळ्या पार्श्‍वभुमीवर पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छा या शिवसेनेला आणि पक्षप्रमुख असलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांना भविष्यातील रुपरेषा निश्‍चित करण्यासाठी अतंर्मुख होऊन विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत.


 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लहान भाऊ मानतात. मोठ्या भावाला मराठी मध्ये वडील बंधु म्हणून संबोधले जाते. त्यामुळे मोठ्या भावाने दिलेल्या शुभेच्छा हा नक्कीच प्रेरणा देणाऱ्या आहेत. मोठ्या भावाने लहान भावाच्या भविष्याची रुपरेषा निश्‍चित करण्याबाबतच्या शुभेच्छा आम्हा शिवसैनिकांसाठी स्वागतार्ह आहेत.‘‘
- प्रशांत बधे,  सहसंपर्क प्रमुख शिवसेना, पुणे शहर

Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com