ठाकरेंची घरात बसून घोषणाबाजी..फडणवीस करताहेत रस्त्यावर उतरुन काम...

'सरकार' म्हणून ज्यांनी जागेवर जाऊन काम करण्याची आवश्यकता होती ते घरात बसले आहेत
3darekar_Thackeray_fadnavis.jpg
3darekar_Thackeray_fadnavis.jpg

मुंबई  :  राज्य सरकार केवळ घरात बसून घोषणा देत असताना भाजपचे कार्यकर्ते मात्र रस्त्यावर उतरून काम करीत आहेत व आपली जबाबदारी पूर्ण करीत आहेत, असा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला लगावला. 

जोगेश्वरी तसेच नवी मुंबईतील उलवे येथे भारतीय जनता पक्षातर्फे उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी दरेकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. 

कोरोनाच्या वाढत्या फैलावातही सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारे अनेक हात जनसेवा करण्यासाठी पुढे येत आहेत. राज्यात कोविड सेंटरची क्षमता वाढवण्याची आवश्यकता असल्याने या संकटकाळात भाजपाकडून ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारली जात आहेत. परंतु राज्य सरकार केवळ घोषणा देण्याचे काम करीत आहे, अशी खरमरीत टीका दरेकर यांनी यावेळी केली.
 
एका बाजूला सरकार आपली जबाबदारी पूर्ण करीत नसताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मात्र आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजप कोरोना संकटकाळात गोरगरिबांसाठी, आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभर फिरून अनेक जिल्ह्यात स्वतः जाऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी करत आहेत. भाजपा लोकप्रतिनिधींकडून रुग्णांना मदत म्हणून अनेक कोविड सेंटर उभारली जात आहेत, असे दरेकर म्हणाले. 

काही दिवसांपूर्वी अमरावती येथे जाऊन त्यांनी आरोग्य व्यवस्थेमधील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे जाऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी करत तेथील आयुक्तांशी चर्चा करून सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. काल पालघर येथे जाऊन कोविड सेंटरची पाहणी करून अनेक बाबींची दखल आम्ही घेतली. 'सरकार' म्हणून ज्यांनी जागेवर जाऊन काम करण्याची आवश्यकता होती ते घरात बसले असले तरी ते काम देवेंद्र फडणवीस कर्तव्य भावनेतून करीत आहेत. भाजपा या संकटकाळात जनतेच्या पाठीशी कायम राहील, असेही दरेकर म्हणाले.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com