मोदींना बाबूंनी बिघडवलं..त्यांना अन्सारी प्रिय वाटतो, तोगडिया आवडत नाही! 

त्यांनाप्रवीण तोगडिया आवडत नाही. त्यांना बाबूंनी बिघडवलं. ते खूप चांगले व्यक्ती होते.
4PRAVIN_TOGDIYA_FINAL_0.jpg
4PRAVIN_TOGDIYA_FINAL_0.jpg

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया Pravin Togdiya यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. एका वृत्तवाहिनींशी बोलताना त्यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे.  'पंतप्रधान नरेंद्र मोदी narendra modi बाजूला बसतच नाही. बसले तर समजवू शकतो ना. त्यांना राम मंदिरच्या सुरुवातीला बाबरी मशिदीसाठी लढणारा अन्सारी प्रिय वाटतो. मात्र राम मंदिरासाठी लढणारा प्रवीण तोगडिया आवडत नाही. त्यांना बाबूंनी बिघडवलं. ते खूप चांगले व्यक्ती होते,'' अशी खोचक टीका प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. 

प्रविण तोगडिया म्हणाले, ''भारताचा इकॉनॉमिक मॉडेल आता बदलावा लागेल. यापूर्वी आता आपला जीडीपी खाली आला आहे. पण तो वाढत होता. एक टक्का जीडीपी वाढला, तर एक कोटी रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत. हे आंतरराष्ट्रीय गणित आहे. भारतात जे मॉडेल आहे. एक टक्का जीडीपी वाढताच एक कोटी रोजगार तयार होत नाहीत. ही जॉबलेस ग्रोथ आहे. जेव्हा जीडीपी वाढतो, तेव्हा सरकारच्या कराच्या माध्यमातून मिळकत वाढते.''
 
राम मंदिराची Ram Temple निर्मिती धूमधडाक्यात होत आहे. अशोक सिंघल, बाळासाहेब ठाकरे व कल्याण सिंग हे राम मंदिराचे खरे हीरो आहेत. त्यांच्यामुळेच मंदिर होत आहे, असा टोलाही काही दिवसापूर्वी प्रवीण तोगडिया Pravin Togdiya यांनी मोदींना लगावला होता. ''राजकारणात वाद चालतातच, राजकारणात भांडणे व वादविवाद चालतच राहतात. त्याची फारशी चिंता करण्याची गरज नाही. ते कधी भांडतील तर कधी गळ्यात गळे घालतील. ते एकत्र जेवणही घेतील सांगता येत नाही,'' असे तोगडीया नारायण राणे व उद्धव ठाकरे वादावर म्हणाले होते.

फडणवीस-ठाकरे यांच्यातील १० मिनिटांच्या चर्चेत नेमकं काय घडलं असेल? 
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक काल झाली. या बैठकीला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, devendra fadnavis कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीपेक्षा चर्चा रंगली आहे ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  cm thackerayआणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बंद खोलीतल्या चर्चेची.  
 Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com