सकारात्मकतेच्या नावाखाली मोदींचा खोटा प्रचार क्लेशदायक..प्रशांत किशोर यांचा आरोप - prashant kishore said modi government positivity campaign its disgusting job we should not become blind campaigners | Politics Marathi News - Sarkarnama

सकारात्मकतेच्या नावाखाली मोदींचा खोटा प्रचार क्लेशदायक..प्रशांत किशोर यांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 मे 2021

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे,

नवी दिल्ली : कोरोना संकट रोखण्यास केंद्र सरकारला अपयश आल्याची टीका होत आहे. आता भाजप सरकार सकारात्मकता पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून सरकार आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. यावरू निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर prashant kishore यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे, प्रशांत किशोर (पीके) यांनी टि्वटवरून मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.  prashant kishore said modi government positivity campaign its disgusting job we should not become blind campaigners

‘शरद पवारांसारखी माणसं आज काँग्रेसमध्ये नसतील तर त्याला जबाबदार कोण?’ शिवसेनेचा सवाल.... 

‘‘अवघा देश शोकसागरामध्ये बुडाला असताना अनेक लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागत आहेत. सकारात्मकतेच्या नावाखाली सातत्याने खोटी माहिती पसरविली जात असून तसा प्रचारही केला जात आहे. हे सगळे क्लेशदायक आहे. केवळ सकारात्मक होण्यासाठी आपण आंधळेपणाने सरकारचा प्रचार करता कामा नये.’’ असे पीकेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  

कोरोना संसर्गाच्या काळामध्ये सकारात्मकतेच्या नावाखाली केंद्र सरकारकडून होत असलेल्या खोट्या आणि चुकीच्या प्रचारावर प्रशांत किशोर (पीके) यांनी टीका केली आहे. सरकारचे हे कृत्य क्लेशदायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर प्रशांतकिशोर यांनी प्रथमच ट्विटरवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

स्वतःचं डोकं वाळूत बुडवून घेणं म्हणजे सकारात्मक होणे नव्हे. हा नागरिकांचा विश्‍वासघात आहे. कोरोनामुळे अनेकांची कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली असून काहींनी त्यांच्या प्रिय व्यक्तीला गमावले आहे तर अनेकजण आजही ऑक्सिजन, रुग्णालये आणि औषधांसाठी तळमळत आहेत. अशा लोकांना सकारात्मक विचारांची खोटी खात्री देणे हा मोठा विनोदच आहे
राहुल गांधी, नेते काँग्रेस 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख