प्रशांत किशोर आखणार 'तृणमूल'च्या पुढील निवडणुकीची रणनीती.. 

'तृणमूल' पुढील निवडणूक त्यांचा मार्गदर्शनाखाली लढणार आहे.
Sarkarnaa Banner (23).jpg
Sarkarnaa Banner (23).jpg

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभूत केल्यानंतर आता पुढील निवडणुकीसाठी 'तृणमूल' आखणी करीत आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काही दिवसापूर्वी  "आपण कुठल्याही पक्षाचे काम करणार नाही," असे जाहीर केलं होतं, पण आता ते तृणमूल कॅाग्रेससोबतच काम करणार आहेत.  prashant kishor wish to quit mamata banerjee gets his team on board till next bengal polls

'तृणमूल' पुढील निवडणूक त्यांचा मार्गदर्शनाखाली लढणार आहे. तृणमूल कॅाग्रेसच्या सूत्रानुसार, विधानसभा निवडणुकीनंतर प्रशांत किशोर आणि तृणमूल काँग्रेसचे नातं अजूनही आहे. प्रशांत किशोर हे तृणमूल काँग्रेससोबतच काम करणार आहेत. त्यांचीही टीम तृणमूलसोबत काम करणार आहेत. 

तृणमूल कॅाग्रेसने २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत  प्रशांत किशोर यांच्या भारतीय राजकीय कारवाई समितीचा समावेश केला आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनजी यांनी प्रशांत किशोर यांना निवडणुक सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. पश्चिम बंगालमध्ये भाजप शंभरचा आकडा पूर्ण करु शकणार नाही, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला होता. तो दाव खरा ठरला. ममता बॅनर्जी या तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्या. प्रशांत किशोर यांनी  यात महत्वाची भूमिका बजावली होती. 

काही दिवसापूर्वी प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यावर "राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही," अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे, याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिली.देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा पवारांची आहे. ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली.

माजी मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान.."मुस्लिम समाज कोरोना लसीकरणापासून दूर पळत आहेत..."
 
ऋषिकेश : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधान केल्याने ते वादात सापडले आहेत. एका कार्यक्रमात ते म्हणाले की, "देशात मुस्लिम समाज कोरोना लसीकरणापासून दूर पळत आहेत. मुस्लिम समाजात लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. ते दूर करणे गरजचे आहे. याबाबत जनजागृती करणं गरजेचं आहे," असे त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले. ऋषिकेश येथे रक्तदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रावत बोलत होते. ते म्हणाले की कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी लशीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकेल. सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमांनी मुस्लिम समाजात याबाबत जनजागृती करणं गरजेचे आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com