भाजपला पराभूत करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी पवारांना सांगितला फॉर्म्युला - Prashant Kishor presented a plan how to defeat BJP   | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

भाजपला पराभूत करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी पवारांना सांगितला फॉर्म्युला

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 जून 2021

भाजपला कसे पराभूत करता येईल, याचा आराखडा प्रशांत किशोर यांनी पवारांसमोर सादर केला. 

नवी दिल्ली :  राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सोमवारी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तीन तास झालेल्या या चर्चेत प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबतची रणनीती पवारांसमोर मांडली. भाजपला कसे पराभूत करता येईल, याचा आराखडा प्रशांत किशोर यांनी पवारांसमोर सादर केला.  Prashant Kishor presented a plan how to defeat BJP

गेल्या निवडणुकीत (२०१४ आणि २०१९) विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी झाल्याने भाजपला सत्ता स्थापन करता आली, त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वच लोकसभा मतदार संघात एकास एक लढत देणे गरजेचे आहे, असे प्रशांत किशोर यांनी पवारांना सांगितले. ५४३ जागापैकी ३५० जागांवर ही एकास एक लढत द्यायला पाहिजे, असा सल्ला त्यांनी पवारांना दिला आहे. तीनशे जागा काँग्रेसने लढवाव्यात, अशी सूचना प्रशांत किशोर यांनी केली आहे.

ता. 11 जून रोजी मुंबईत प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची पहिली भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर प्रशांत किशोर व पवार यांच्यात सोमवारी पुन्हा बैठक झाली. तर मंगळवारी पवार यांच्या घरी काही विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंच या व्यासपीठाच्या अंतर्गत ही बैठक घेण्यात आली. ही बैठक तिसऱ्या आघाडीसाठी होत असल्याची चर्चा होती. 

पण बैठकीतील नेत्यांनी काँग्रेसला वगळून कोणतीही तिसरी आघाडी करण्याबाबत चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केलं होतं.या बैठकीनंतर बुधवारी पुन्हा एकदा प्रशांत किशोर शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना सुरूवात झाली आहे. ही भेट सदिच्छा भेट असल्याचा दावा काल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही केला होता. पण 15 दिवसांत तीनवेळा भेट झाल्याने तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे.
 Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख