निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा..नाहीतर भाजपला एवढ्याही जागा मिळाल्या नसत्या... प्रशांत किशोर यांचा आरोप - prashant kishor attacks election commission | Politics Marathi News - Sarkarnama

निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा..नाहीतर भाजपला एवढ्याही जागा मिळाल्या नसत्या... प्रशांत किशोर यांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 मे 2021

 निवडणूक आयोगाने भाजपला पाठिंबा देण्याचे काम केले

नवी दिल्ली : बंगालमधील विधानसभा निवडणूक ही निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासाठी महत्वाची आहे. "बंगालमध्ये भाजप तीन अंकी आकडा गाठू शकणार नाही. जर भाजपला शंभर जागा मिळाल्या तर मी काम बंद  करणार," असे प्रशांत किशोर यांनी सांगितले होते. बंगालच्या निवडणुकीबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'एनडीटीव्ही'च्या मुलाखतीत ते बोलत होते. 

"भाजपा ८० जागा मिळेल असा माझा अंदाज आहे. निवडणूक आयोगाने पक्षपात केला म्हणून भाजपला एवढ्या जागा मिळाल्या आहेत. जर  निवडणूक आयोगाने निपक्षपातीपणे काम केले असते तर एवढ्याही जागा भाजपला मिळाल्या नसत्या.  निवडणूक आयोगाने भाजपला पाठिंबा देण्याचे काम केले आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया जास्तीत जास्त टप्यात घेण्यात आली. ही निवडणूक आणि दहा ते पंधरा दिवसात घेता आली असती, पण निवडणूक आयोगाने त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी घेतला," असे प्रशांत किशोर म्हणाले.  

"ममता बॅनर्जी यांनी मुस्लिमांनी एकजूट होऊन मतदान करण्याचे आवाहन केले होते. याबाबत त्यांना निवडणुक आयोगाने नोटीस बजावली होती. जर असे असते तर भाजपच्या प्रत्येक नेत्याला नोटीस द्यावी लागेल," असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. प्रशांत किशोर यांनी ममता दीदींचे खूप कैातुक या मुलाखती दरम्यान केले. ते म्हणाले की, ममतादीदी यांच्यासोबत काम करणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.

 'दीदी ओ दीदी'ला जनतेचं सडेतोड उत्तर : अखिलेश यादव

राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींचे अभिनंदन केले आहे. दुसरीकडे उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना आनंद झाला आहे. त्यांनी टि्वट करीत ममतादीदींचं अभिनंदन केले आहे. भाजपवर निशाणा साधला आहे. 

आपल्या टि्वटमध्ये अखिलेश यादव म्हणतात की, पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला पराभूत करणारी जागरुक जनता, लढाऊ ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या समर्पित नेते आणि कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन. भाजपने एका महिलेवर केलेल्या 'दीदी ओ दीदी' या अपमानजनक टिप्पणीला जनतेने दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे.  अखिलेश यादव यांनी दीदी जिओ दीदी हॅशटॅग केला आहे. अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांना पुष्पगुच्छ देतानाचा फोटो टि्वट केला आहे. 

 Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख