प्रशांत भूषण म्हणतात, "" याच अनिल अबांनींना मोदींनी 30 हजार कोटींचं कंत्राट दिलं होतं !  - Prashant Bhushan says, "Modi had given a contract worth Rs 30,000 crore to Anil Abani! | Politics Marathi News - Sarkarnama

प्रशांत भूषण म्हणतात, "" याच अनिल अबांनींना मोदींनी 30 हजार कोटींचं कंत्राट दिलं होतं ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

आपण सर्वसाधारण आयुष्य जगत असून आपल्याकडे एकच कार असल्याचेही म्हटले आहे. अनिल अंबानी यांची ही बातमी प्रसिद्ध होताच ज्येष्ठ विधिज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी ट्विट करून अनिल अंबानी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समाचार घेतला आहे. 

मुंबई/ नवी दिल्ली : एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाव झळकलेले भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होत असून त्यांनी खटला लढवण्यासाठी दागिने मोडण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे. अंबानी यांची ही माहिती जगासमोर येताच सर्वानाच धक्का बसला आहे. 

आपण सर्वसाधारण आयुष्य जगत असून आपल्याकडे एकच कार असल्याचेही म्हटले आहे. अनिल अंबानी यांची ही बातमी प्रसिद्ध होताच ज्येष्ठ विधिज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी ट्विट करून अनिल अंबानी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समाचार घेतला आहे. 

प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की न्यायालयात आपल्या संपत्तीची अशी माहिती देणाऱ्या याच अनिल अंबानी यांना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेलचं तीस हजार कोटींचं ऑफसेट कंत्राट दिले होते. 

अनिल अंबानी यांचे थोरले बंधू मुकेश अंबानी यांचे आजही जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत नाव असते. ते सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत तर त्यांचा सखा भाऊ मात्र कर्जबाजारी आहे. अनिल अंबानी यांचे मागे बंधू मुकेश अंबानी यांनी कर्ज भरले असते. जर ते कर्ज भरले नसते अनिल अंबानी यांना अटक होण्याची शक्‍यता होती. त्यावेळी मोठा भाऊ लहान भावाच्या मदतीला धावून आले होते. 

अनिल अंबानी यांनी इंग्लडच्या कोर्टात सागितले की. ते साधारण आयुष्य जगत असून, त्यांच्याकडे एक कार असल्याचा दावा त्यांनी खटल्यादरम्यान केला आहे. 

कर्ज न चुकवल्याप्रकरणी इंडस्ट्रियल एंड कमर्शीयल बॅंक ऑफ चायना, एक्‍स्पोर्ट एंड इम्पोंर्ट बॅंक ऑफ चायना आणि चायना डेव्हलपमेंट बॅंकेने अंबानी यांना इंग्लडच्या कोर्टात खेचले असून, त्याची सुनावणी सुरु आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून अंबानी यांनी आपली बाजू मांडली. 

गेल्या सहा महिन्यात साडे नऊ कोटींचे दागिने विकले, घरात आता कुठलीही महागडी वस्तु शिल्लक राहीली नसल्याचे अनिल अंबानी यांनी म्हटले. अंबानी यांच्याकडे कारचा ताफा असल्याचा आरोप बॅंकेच्या वकीलांनी केला होता. त्यावर स्पष्टीकरण देतांना ही चुकीची माहिती माध्यमांनी पसरवली असून, माझी राहणी अंत्यत साधी असून मी मद्य, सिगरेट पीत नाही. आता माझ्याकडे केवळ एक कार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

22 मे 2020 ला इंग्लडच्या कोर्टाने अनिल अंबानी यांना चीनच्या तीन बॅंकाचे साडेपाच हजार कोटी 12 जूनपर्यत चुकवण्याचे आदेश दिले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख