लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर प्रांताधिकारी दीपक शिंदे तडकाफडकी निलंबित..  - prantadhikari deepak shinde suspended action taken due to financial transactions | Politics Marathi News - Sarkarnama

लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर प्रांताधिकारी दीपक शिंदे तडकाफडकी निलंबित.. 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 जून 2021

शिंदे यांच्याविरोधात शेतकरी, नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या मोठ्या तक्रारी होत्या.

सोलापूर :आर्थिक देवाणघेवाणीच्या तक्रारीवरून दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटचे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना राज्य सरकारने गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले आहे. या निलंबनामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. महसूल व वनविभागाचे उपसचिव डाँ. माधव मोरे यांनी शिंदेंच्या निलंबनाचा आदेश काढला आहे.  हा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्फत जिल्ह्याधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे.prantadhikari deepak shinde suspended action taken due to financial transactions

शिंदे यांच्याकडे प्रांताधिकारीचा कार्यभार असताना भूसंपादनाचीही अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर होती. प्रांतधिकारी पदावर येण्यापूर्वी ते भूंसंपादन अधिकारी म्हणून पूर्णवेळ काम पाहत होते. शिंदे यांच्याविरोधात शेतकरी, नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या मोठ्या तक्रारी होत्या. ते सरकारी वाहन न वापरता खासगी वाहन वापरत होते. तसेच सरकारी वाहन चालक न ठेवता खासगी वाहन चालक त्यांनी नेमला होता. या सर्व प्रकरणाची आता चैाकशी होणार आहे.  

प्रांताधिकारी शिंदे यांच्याविरोधात जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधींच्या विविध तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या तक्रारीसोबत शिंदे यांची आर्थिक देवाणघेवाणीची ध्वनीफितही प्रशासनाकडे दाखल करण्यात आली होती.  प्रशासनाला सादर केलेल्या या ध्वनीफितीत आर्थिक देवाणघेवाणीचे संभाषण आहे. ते गंभीर आहे. या प्रकरणाची चैाकशी करणार असल्याचे सरकारने ठरविलं आहे.  चैाकशी पूर्ण होईपर्यंत शिंदे यांच्यावर निंलबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितलं.

'तृणमूल'च्या खासदार नुसरत जहाँ यांच्या आरोपनंतर पती निखिल जैन यांचा मोठा खुलासा..

नवी दिल्ली : बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल कॅाग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्या मोडलेल्या विवाहाची चर्चा गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर रंगली आहे. या प्रकरणात अनेक नवीन खुलासे समोर येत आहेत. नुसरत जहाँ Nusrat Jahan यांनी आपले लग्न अवैध असल्याचे दोन दिवसापूर्वी सांगितलं. यावर त्यांचे पती निखिल जैन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नुसरतने सांगितलं आहे की आमचं लग्न अवैध आहे तर आमचा घटस्फोट कशासाठी..असा सवाल निखिल जैन यांनी उपस्थित केला आहे. निखिल यांनी आपल्या लग्नाचे सारे फोटो सोशल मीडियावरुन काढून टाकले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख