आंबेडकरांचा मोदींवर निशाना; म्हणाले, 'आरोग्यावर परिणाम तर होत नाही ना?'  - Prakash Ambedkar's criticism of Modi moving his hand in an empty tunnel | Politics Marathi News - Sarkarnama

आंबेडकरांचा मोदींवर निशाना; म्हणाले, 'आरोग्यावर परिणाम तर होत नाही ना?' 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

रिकाम्या बोगद्यात मोदी कोणाकडे पाहून हात हलवत आहेत, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

मुंबई : मनाली ते लडाखला जोडणाऱ्या रोहंताग अटल बोगद्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले. त्यानंतर मोदी यांनी हात हलवत बोगद्यातून फेरफटका मारला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून प्रचंड व्हायरल होत असून रिकाम्या बोगद्यात मोदी कोणाकडे पाहून हात हलवत आहेत, असा प्रश्‍न विचारला जात आहे. त्याच मुद्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटवरून मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. 

ऍड. आंबेडकर यांनी ट्‌विटरमध्ये म्हटले आहे की, निर्जन बोगद्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाला पाहून हात हलवत होते. त्या ठिकाणी नागरिक तर हजर नव्हते. देशाला आर्थिक दुर्देशेच्या मार्गावर नेणाऱ्या आत्मकेंद्री पंतप्रधानांच्या आरोग्यावर तर परिणाम होत नाही ना? पंतप्रधानाच्या आरोग्याविषयी जनतेला माहिती मिळणे गरजेचे आहे. तसेही आदरणीय यापूर्वी अनेकदा असे वागले आहेत, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली आहे. 

सुमारे 9.2 किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे मनाली ते केलॉंग अंतर 46 किलोमीटरने कमी होणार आहे. त्याचा फायदा परिसरातील गावांना होण्याबरोबरच सामरिकदृष्ट्याही तो महत्त्वाचा ठरणार आहे. या अटल बोगद्याच्या उद्‌घाटनानंतर मोदी यांनी टनेलची पाहणी केली. त्या वेळी ते हात हलवत टनेलचा फेरफटका मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरला झाला आहे. त्यावर विरोधकांनी टिकेचा सूर लावला आहे. रिकाम्या बोगद्यात मोदी कुणाला पाहून हात हलवत आहेत, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

"सुनसान टनेल में प्रधानमंत्री किसे देखकर हाथ हिला रहे थे? वहॉं जनता मौजूद नहीं थी। कहीं देश अनर्थ की राह पर झोंक देनेवाले आत्ममुग्ध प्रधानमंत्री के स्वास्थ्य पर असर तो नहीं हो रहा? जनता को पीएम की स्वास्थ्य सम्बन्धी जानकारी मिलनी चाहिए। वैसे आदरणीय पहले भी कई बार ऐसा कर चुके हैं।' असे ट्विट आंबडेकर यांनी ट्विट केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख