एकाचे मुंबई तर दुसऱ्याचे बारामतीवर लक्ष..राज्य वाऱ्यावर..सरकार "सह्याजीराव" झालयं.. - Prakash Ambedkar criticism on Mahavikas Aghadi government | Politics Marathi News - Sarkarnama

एकाचे मुंबई तर दुसऱ्याचे बारामतीवर लक्ष..राज्य वाऱ्यावर..सरकार "सह्याजीराव" झालयं..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 मे 2021

सरकार बरखास्त केलं तर सह्या कोण करेल? त्यामुळे हे सह्याजीराव सरकार  असल्याचे  प्रकाश आंबेडकर  म्हणाले.

अकोला : कोरोना विषाणू कोविड-१९ च्या पहिल्या लाटेत उपाचारासाठी उभी केलेली यंत्रणा बळकट करण्याऐवजी ती मोडून टाकण्यात आली. त्यामुळे दुसरी लाट आली तेव्हा उपचाराविना माणसं मेली. एकाचे मुंबई तर दुसऱ्याचे बारामतीवर लक्ष आहे, उर्वरित राज्य वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. हे सरकार Mahavikas Aghadi governmen म्हणजे सह्याजीराव झाले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर  Prakash Ambedkar यांनी केला.  सध्याच्या परिस्थितीत सह्या करण्यासाठी कुणीतरी लागतं. सरकार बरखास्त केलं तर सह्या कोण करेल? त्यामुळे हे सह्याजीराव सरकार  असल्याचे ते म्हणाले. Prakash Ambedkar criticism on Mahavikas Aghadi government

कोविड विषाणू संसर्गाच्या संकटात आपातकालीन व्यवस्थापनावर राज्य सरकारला आलेल्या अपयशाबाबत व तिसरी लाट थोपविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (ता.१७) अकोला येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषद माहिती दिली. यावेळी राज्यातील आपातकालीन व्यवस्थेबाबत राज्य सरकार गंभिर नसल्याचा आरोप त्यांनी केला.  मुख्यमंत्र्यांचे मुंबई तर उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीवरच लक्ष आहे. उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला. 

व्हेंटिलेटर आणि मोदी दोन्हीही कामात अपयशी..राहुल गांधींची टीकास्त्र 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काम नाही केलं तरी चालेल, पण राज्यातील आपातकाली समित्या बळकट करा. त्यामुळे नागरिकांना वेळेवर उपाचाराबाबत व आपतकालीन व्यवस्थापनाबाबत योग्य सल्ला या समित्या देवून मदत करू शकतील, असा सल्लाही त्यांनी राज्य सरकारला दिला. कोविडची दुसरी लाट अनियंत्रित झाल्याने राज्य सरकार अपयशी ठरल्यात असल्याने ते बरखास्त का करण्यात येऊ नये, या प्रश्नावर बोलताना ॲड. आंबेडकर यांनी सध्याच्या परिस्थितीत सह्या करण्यासाठी कुणीतरी लागतं. सरकार बरखास्त केलं तर सह्या कोण करेल? त्यामुळे हे सह्याजीराव सरकार सुरू असल्याचे ते म्हणाले.  पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला पराभूत करण्यासाठी कोविड-१९ ची दुसरी लाट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओढून घेतलेले संकट असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. 
 

पत्र लिहण्याच्या भानगडी करीत राज्यभर वनवन फिरण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातच बसावे. तेथे एक-दोन कोविड सेंटर सुरू करून नागपुरकरांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असा सल्ला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस यांना दिला आहे. 

कोरोना संकटात वंचित बहुजन आघाडीचे १२ कार्यकर्त्यांचे बळी गेले. मी मानत नाही, पाळत नाही म्हणून कार्यकर्तेही कोरोनाला मानत नाही, हे लक्षात आले. त्यांची सुरक्षा महत्त्वाची. मी लस घेतली तर कार्यकर्तेही घेतील, या उद्देशाने मी कोविड-१९ ची लस घेतली असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितेल. त्यांनी कार्यकर्ते व नागरिकांना लस घेण्याचे आवाहनही यावेळी केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख