प्रदीप शर्मा कोर्टात झाले भावूक.. - Pradip Sharma remanded in NIA custody till 28 june | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

प्रदीप शर्मा कोर्टात झाले भावूक..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 जून 2021

ती तवेरा गाडी संतोष शेलारची आहे..

मुंबई :  एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा  NIA नेअटक केली आहे.  प्रदीप शर्मा यांना मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक केली आहे. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी राष्ट्रीय तपास यंत्रणा  NIA ने आज सकाळी छापा टाकला होता. Pradip Sharma remanded in NIA custody till 28 june

काही महत्वाचे पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. प्रदीप शर्मांना ईडीच्या स्पेशल कोर्टात हजर करण्यात आले. प्रदीप शर्मा,  मनीष सोनी आणि सतोष शेलार यांना २८ पर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. त्यापूर्वी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.  "सचिन वाझे आणि माझा काही संबध नाही. संतोष शेलार हा माझा जुना खबरी होता. ज्यांना अटक केली आहे, त्यांनी मी ओळखत नाही. या प्रकरणात माझा सहभाग असता तर मी थांबलो असतो का," असे शर्मा यांनी सांगितले. 

या संपूर्ण प्रकरणात शर्मा यांनी आरोपींसह साक्षीदारांना पैसे पुरवलं आहेत, असे एनआयएच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. यावेळी सुनिल मानेची पून्हा कस्टडी मागण्यात आली. ज्या गाडीत मनसुखचा हत्या झाली. ती तवेरा गाडी संतोष शेलारची आहे, असे एआयएने सांगितले. 

मनसुख हिरेन यांना सचिन वाझेनेच फोन करून बोलावले. त्यावेळी गाडीत वाझेसोबत सुनिल मानेही होता. या दोघांनी मनसुखला मनीष, संतोष, आनंद, सतीश यांच्या गाडीत बसण्यास सांगितले. ता. ४ मार्चला मनसुख घराबाहेर पडले त्यानंतर ता. ५ मार्चला मनसुख यांचा मृतदेह मिळाला, असे एनआय़एच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. 
  
मनसुख हिरेन प्रकरणात निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी प्रदीप शर्मा हे एनआयएच्या रडारवर होते. आज सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या अंधेरी येथील घरी एआयएने छापा मारला होता. त्यांची चार तास चैाकशी करुन त्यांना ताब्यात घेतले होते. निवृत्त पोलिस अधिकरी प्रदीप शर्मा यांची यापूर्वीही सलग दोन दिवस याप्रकरणी चैाकशी झाली आहे. त्यावेळी शर्मा यांच्या मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला होता. 

या प्रकरणात नुकतीच NIA नं संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक केली होती. संतोष हा शर्मांच्या जवळचा व्यक्ती असल्याचं बोललं जातं, बुधवारी पीएस फाऊंडेशनच्या दोघा जणांनाही NIA नं चौकशीला बोलावलं होतं. या प्रकरणात विनायक शिंदे आणि वाझे यांची अंधेरीत बैठक झाल्याचं बोललं जातं, त्यावेळी माजी पोलिस अधिकारी उपस्थित असल्याचं सांगितलं जातं. शर्मा यांनी ३९२ गुंडांचा एन्कांऊटर केला आहे. 

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख