ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून चैाकशीचे आदेश..

पिंपळगाव पिंपळे (जालना) येथील ३ सख्ख्या भावांच्या मृत्यू प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
 ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून चैाकशीचे आदेश..
jalna21.jpg

जालना : पिंपळगाव पिंपळे (जालना) येथील ३ सख्ख्या भावांच्या मृत्यू प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. महावितरणचे औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांना हे आदेश दिले आहे. तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करा, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.  

ज्ञानेश्वर जाधव (वय 28), रामेश्वर जाधव (वय 25) आणि सुनील जाधव (वय 18) वर्ष या तीन भावांचा ऐन दिवाळीत (ता. १९ नोव्हेंबर) मृत्यू झाला आहे. सकाळी शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता वीजखांबावरील शॉटसर्किट हुन तिघां भावाचा मृत्यू झाला आहे.  भोकरदन तालुक्यात पिंपळगाव पिंपळे इथं घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. नेमका शॉक कसा लागला याचाही शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस सध्या या प्रकरणात कुटुंबीय आणि स्थानिकांचीही चौकशी करत आहेत.

तिघे भाऊ शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेले होते. शेतात जाताच पाणी सोडण्यासाठी तिघे विहिरीवर विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेले असता शॉक लागला. यावेळी एकमेकांची मदत करण्यात तिघांचाही मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेईपर्यंत तिघांचेही प्राण गेल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. 
 

हेही वाचा : शाळा सुरु करण्याचे सरकाचे षड्यंत्र ; शिक्षकांचा आरोप.

बुलढाणा : जिल्ह्यात व राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून शाळा सुरु होणार आहेत, असे आदेश सुद्धा जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. शाळा सुरु करण्यामागे  सरकारच षडयंत्र आहे, असे काही शिक्षकांना वाटत आहे. अमरावती व पुणे विभागात शिक्षक आमदार निवडणूक असल्याने उमेदवाराना शिक्षक मतदारांना भेटता येत नाही, शिक्षक मतदार हे घरी असल्याने प्रत्येक मतदाराला भेटने शक्य नसल्याने,  सरकार ने शाळा सुरु करून शिक्षकाना शाळेत बोलावून या निवडणुकीत प्रचार सोपा जावा, उमेदवाराना शिक्षक मतदाराला एकाच ठिकाणी भेटता यावे, यासाठी अमरावती व पुणे विभागातील शाळा सुरु करण्याचा घाट सरकारने चालविला, तर राज्यात अनेक जिल्ह्यात शेकडो शिक्षक कोरोनाबाधित आढळत असताना शाळा सुरु करून सरकार "रिस्क" घेत असल्याचं काही शिक्षकाना वाटत आहे.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in