सदस्य सहलीला गेल्याने खेड सभापती निवड लांबणीवर - Postponement election of Khed Speaker   | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

सदस्य सहलीला गेल्याने खेड सभापती निवड लांबणीवर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 जून 2021

पंचायत समिती सदस्य, नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच सहलीला गेलेले आहेत.

राजगुरुनगर : खेड पंचायत समितीच्या नवीन सभापती निवडीला मुंबई उच्च न्यायालयाने २५ जूनपर्यंत दिलेली स्थगिती ५ जुलैपर्यंत वाढविली आहे. शिवसेनेचे खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात ३१ मे रोजी अविश्वास ठराव ११ विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी घोषित केले होते. त्या निर्णयाला आव्हान देत पोखरकर, पंचायत समिती सदस्य अमोल पवार व ज्योती अरगडे यांनी आव्हान याचिका दाखल केली आहे.  Postponement election of Khed Speaker 

न्यायाधीश एस. सी. गुप्ते आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आहे. त्यांनी १० जून रोजी झालेल्या सुनावणीत, खेडच्या नवीन सभापती निवडीस २५ जूनपर्यंत स्थगिती दिल्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात काल झालेल्या दुसऱ्या सुनावणीत ही स्थगिती ५ जुलैपर्यंत वाढविली आहे. वादींचे वकील ॲड. रोहन होगले यांनी ही माहिती दिली. 

दरम्यान, अविश्वास ठरावानंतर ठरावाच्या बाजूने मतदान केलेले बहुतांश पंचायत समिती सदस्य, नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच सहलीला गेलेले आहेत. या स्थगितीच्या निर्णयामुळे त्यांचा मुक्काम वाढला होता. तो आता अजून वाढणार की ते सहलीवरुन परत येणार, याबाबतही लोकांना उत्सुकता आहे.
 

हेही वाचा : आंबिल ओढ्यातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती 
मुंबई : पुणे शहरातील आंबिल ओढा झोपडपट्टी भागातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन त्याबाबतचे आदेश पुणे महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती शिंदे यांनी या वेळी दिली.  दरम्यान, या तोडकामाला न्यायालयानेही ७ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. हा प्रश्न शासकीय स्तरावर प्रश्न सोडवावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेमार्फत अतिक्रमीत घरे पाडण्याची कारवाई सुरु केल्यामुळे स्थानिकांच्या विरोधामुळे तणाव निर्माण झाला होता.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख