लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारणार्थ डाक पाकिटाचे आज अनावरण 

सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून त्यांच्या स्मरनार्थ डाक पाकिट व तिकीट कॅन्सलेशन शिक्क्याचे अनावरण होणार आहे.
 Gopinath Munde .jpg
Gopinath Munde .jpg

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या स्मारणार्थ डाक पाकिटाचे आज अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी १ वाजता गोपीनाथ गड परळी येथे होणार आहे.  (A postal envelope in memory of Loknete Gopinath Munde will be unveiled today)

गोपीनाथ मुंडे यांनी जवळपास पाच दशके समाजकारण करत राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारणात आणि समाजकारणातही त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून त्यांच्या स्मरनार्थ डाक पाकिट व तिकीट कॅन्सलेशन शिक्क्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) व्हर्च्युअल पद्धतीने नवी दिल्ली येथून उपस्थित राहणार आहेत. 

त्याच बरोबर कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, ऑनलाइन कार्यक्रमाध्ये सहभागी होणार आहेत.  परळीतील गोपीनाथ गडावरुन माजी मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचीव पंकजा मुंडे, (Pankaja Munde) खासदार प्रितम मुंडे, (Pritam Munde) खासदार भागवत कराड हे सहभागी होणार आहेत. दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतात. मात्र, कोरोनामुळे या वर्षी हा सोहळा ऑनलाइन पार पडणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com