गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठा आमदारांविरूध्द लढा उभारावा.. - Poor Marathas should fight against rich Maratha MLA | Politics Marathi News - Sarkarnama

गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठा आमदारांविरूध्द लढा उभारावा..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 सप्टेंबर 2020

गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल, असे मत  बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. 

पुणे : महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरीब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरीब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. गेल्या आठवड्यात याची सुनावणी झाली. त्यावेळी न्यायाधीशांनी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असून त्याची पुढील सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे (बेंच) दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला तात्पुरती का होईना स्थगिती मिळाल्याने मराठा समाजात नाराजीचे वातावरण आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राजकारण केले जात असल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.  

कोरोना काळात आंदोलने नको; मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन
 
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार या समाजाच्या बरोबर आहे. आम्ही सर्व ते प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे कोरोनाच्या संकटाच्या काळात आंदोलने करु नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याबाबत कुणीही गैरसमज पसरवू नये, असेही आवाहन त्यांनी केले. ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मिडियावरुन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांसह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, "हा विषय अशा पद्धतीने येण्याची आवश्यकता नव्हती. गेल्या वेळी विधीमंडळातल्या सर्व पक्षांनी मराठा आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला. त्यावेळी आम्ही भाजपबरोबर सत्तेत होतो. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात होते. आज चित्र बदलले असले तरी सर्व पक्ष मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकाच मताचे आहेत,'' 

ठाकरे म्हणाले, "सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर  उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. तिथे आपण जिंकलो. पहिल्या सरकारने त्यावेळी दिलेले वकील आपण बदलेले नाहीत. उलट त्यात वाढ केली आहे. सर्वोत्तम वकील दिले आहेत. काही संस्था - व्यक्तींनी आपल्या पसंतीचे वकिल दिले आहेत. हे सर्वजण आपापल्या पद्धतीने बाजू मांडत आहेत. न्यायालयात युक्तीवाद करायला आपण कमी पडलेलो नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती दिली आहे. मात्र मोठ्या बेंचसमोर जायला परवानगी दिली आहे, ही लढाई आपण नक्की जिंकू,"
Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख