पूजा चव्हाण प्रकरणातील 'ते' मंत्री गायब..पण त्यांची गाडी सापडली.. - Pooja Chavan death case gets a new twist Sanjay Rathod | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

पूजा चव्हाण प्रकरणातील 'ते' मंत्री गायब..पण त्यांची गाडी सापडली..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

शिवसेनेचे मंत्री राठोड काही दिवसापासून नाँटरिचेबल आहेत.

मुंबई : टिकटाँक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणला नवे वळण लागले आहे. तिच्या सोबत राहणारा तिचा भाऊ आणि त्या भावाच्या मित्राचा जवाब पोलिसांनी घेतला आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काल केली. 

भाजपने शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन आरोप केला आहे, आता या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्या मंत्र्यांची चैाकशी करणार आहेत. याप्रकरणात गंभीर आरोप असलेले शिवसेनेचे मंत्री राठोड काही दिवसापासून नाँटरिचेबल आहेत. पण त्यांची गाडी मुंबईत चर्चगेट परिसरात सापडली आहे. त्यामुळे संजय राठोड मुंबई आहेत का, असा शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  पूजाचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालात डोक्याला आणि मणक्याला दुखापत झाल्याने पूजाचा मृत्यू झाला असल्याचे म्हटलं आहे. 

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूच्या कारणांचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. 'पहिल्या मजल्यावरून पडलेली पूजा चव्हाण हिने मद्यपाशन केले होते, असा जबाब तिच्या सोबत वास्तव्यास असलेला तिचा भाऊ व त्या भावाच्या मित्राने पोलिसांकडे दिला आहे,' अशी माहिती वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक लगड यांनी दिली आहे. त्यामुळे पूजाच्या मृत्यूबाबत पुन्हा निराळ्या शंका सुरू झाल्या असून तिनं दारू पिली होती की तिला दारू पाजण्यात आली होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

पूजा चव्हाणचा मृत्य म्हणजे आत्महत्याच आहे, असे नोंदविलेले नाही हे स्पष्ट करण्यात आले. तसेच तिच्या मृत्यूबाबत सोशल मीडियात व्हायरल झालेल्या आँडिओ क्लिप पोलिसांनाही मिळाल्या आहेत. त्यातील बऱ्याच क्लिप या बंजारा बोलीत असल्याने त्याच्या भाषांतराचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

पूजा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने रविवारी (ता. आठ फेब्रुवारी) तिचा मृत्य झाला. महम्मदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील फ्लॅटमधअये पूजा हि तिचा भाऊ आणि भावाचा मित्र यांच्यासोबत राहत होती. मूळ परळी वैजनाथ येथील असलेली पूजा ही स्पोकन इंग्रजीच्या क्लाससाठी पुण्यात महिनाभरापूर्वी आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ती गॅलरीतून पडली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. तिचा भाऊ विलास चव्हाण व अरूण राठोड यांनी तिला तेव्हा तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला. 

वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ महिन्यापूर्वी ही तरुणी पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी आली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला. आई-विडीलांचा जबाब घेतला असता त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. मात्र ती सोरायसीस या आजाराने त्रस्त असल्याने तिने आत्महत्याचे पाऊल उचलले असावे. घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आली नाही.
 
  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख