महाराष्ट्रातील देशी ओवेसी कोण? शिवसेनेचा सवाल..

पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही तसंच होईल,” असं विधान साक्षी महाराज यांनी केलं होतं.
smos16.jpg
smos16.jpg

मुंबई : भाजपचे खासदार भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांच्यासह खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर शिवसेनेने आज निशाणा साधला आहे. “ओवेसी यांनी बिहारमध्ये भाजपाची मदत केली. आता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही तसंच होईल,” असं विधान साक्षी महाराज यांनी केलं होतं. यावरून सामनाच्या अग्रलेखात त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. 

साक्षी महाराज म्हणतात, ‘ओवेसी मदतीला होते म्हणून आम्ही बिहार जिंकले. आता ओवेसीसाहेब आम्हाला प. बंगाल आणि उत्तर प्रदेशातही मदत करतील. ओवेसींची मदत भाजपास होते ही भगवंताचीच कृपा आहे. परवरदिगार भगवंत ओवेसींना अधिकाअधिक शक्तिमान करो!’ साक्षी महाराजांनी भाजपचे अंतरंगच उघडून दाखवले. कमळाच्या फुलातील कुंजबिहारी हे अटलबिहारी वाजपेयी, दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, आडवाणी, मोदी, अमित शहा असावेत या भ्रमातून साक्षी महाराजांनी लोकांना बाहेर काढून कमळाच्या फुलातील भुंगा म्हणजे मियाँ ओवेसी आहेत हेच दाखवले आहे. बिहारात ओवेसी यांनी मुस्लिमबहुल सीमांचलात पाच जागा जिंकल्या व किमान 17-18 जागांवर तेजस्वी यादवांचे नुकसान केले. नाहीतर बिहारात राजकीय परिवर्तन नक्कीच झाले असते. मुसलमानांची मते ‘सेक्युलर’छाप राजद, समाजवादी पार्टी किंवा काँग्रेसकडे जाऊ नयेत, त्यांना ही हुकमी मते मिळू नयेत यासाठी मियाँ ओवेसी यांचा पद्धतशीर वापर केला जातो, असे अग्रलेखात म्हटलं आहे. 

भारतीय जनता पक्ष इतरांना नैतिकतेचे व हिंदुत्वाचे धडे देत असतो. त्या शुद्ध हिंदुत्वात ओवेसीच्या उंगल्याही बुडत असतात, असा टणत्कार साक्षी महाराजांनी केला आहे. ओवेसी ही जशी त्यांची एक गुप्त शाखा आहे तशा गुप्त शाखा इतरत्र आहेतच. फोडा, झोडा व विजय मिळवा हेच त्या गुप्त शाखांचे धोरण आहे. साक्षी महाराजांनी भंडाफोड केलाच आहे. त्यांनी अनवधानाने सत्य जाहीर केले. सध्याच्या काळात सत्य बोलणे हा गुन्हाच आहे. साक्षी महाराज धाडसाने सत्य बोलले. भाजपचा परवरदिगार भगवंत साक्षी महाराजांना अधिक शक्तिमान करो. शक्तिमान होण्याची मक्तेदारी काय फक्त मियाँ ओवेसींचीच आहे, असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. 

आता मुंबई-महाराष्ट्रातील देशी ओवेसी कोण? ते लवकरच कळेल. साक्षी महाराजांनी भंडाफोड केलाच आहे. त्यांनी अनवधानाने सत्य जाहीर केले. सध्याच्या काळात सत्य बोलणे हा गुन्हाच आहे. साक्षी महाराज धाडसाने सत्य बोलले. भाजपचा परवरदिगार भगवंत साक्षी महाराजांना अधिक शक्तिमान करो. शक्तिमान होण्याची मक्तेदारी काय फक्त मियाँ ओवेसींचीच आहे? असा प्रश्न अग्रलेखात विचारण्यात आला आहे. 

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात..

  1. प. बंगालात मियाँ ओवेसी यांनी जे कार्य सुरू केले आहे, त्यामुळे भाजपचे चेहरे आनंदाने फुलू लागले आहेत. 
  2. ओवेसी यांच्या सहकार्याने भाजपास बंगाल जिंकायचा आहे. म्हणजे हिंदुत्वविरोधी शक्तीचा वापर करूनच हिंदुत्वाचा जयजयकार करायचा आहे. 
  3. भारतीय जनता पक्षाने ओवेसीसारख्यांची मदत घेऊन फायद्याचे राजकारण करावे, पण मग आम्हीच कसे राष्ट्रवादी किंवा हिंदुत्ववादी आहोत असले ‘टेंभे’ यापुढे मिरवू नयेत. 
  4. मियाँ ओवेसीचा पक्ष ही आमचीच एक गुप्त शाखा आहे हे त्यांनी मान्य करावे. अशा अनेक गुप्त शाखा त्यांनी राज्याराज्यांत वाढवून आणि पोसून ठेवल्या आहेत. मतविभागणीवर जोर हाच मंत्र आहे.
  5. ओवेसी ही जशी त्यांची एक गुप्त शाखा आहे तशा गुप्त शाखा इतरत्र आहेतच. पह्डा, झोडा व विजय मिळवा हेच त्या गुप्त शाखांचे धोरण आहे. 
  6. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भगवा उतरविण्याची मस्तवाल भाषा याच ‘गुप्त शाखे’शी हातमिळवणी करून केलेला कट दिसतोय. 

(Edited  by : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com