पश्चिम बंगालमध्ये शिवसेना निवडणूक लढविणार... - Politics Shiv Sena to contest elections in West Bengal sanjay raut | Politics Marathi News - Sarkarnama

पश्चिम बंगालमध्ये शिवसेना निवडणूक लढविणार...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 18 जानेवारी 2021

शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढविणार, असे  संजय राऊत यांनी  सांगितले.

मुंबई : "शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढविणार," असे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांचा आंदोलनाबाबत राऊत म्हणाले की शेती विषयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे जाणकार आहेत, केंद्र सरकारने त्यांचा सल्ला घ्यावा. 

पत्रकार अर्णब गोस्वामी चॅ्टविषयी विचारलेल्या प्रश्नाबाबत संजय राऊत म्हणाले की संरक्षण खात्यातील गुपिते चोरणाऱयांना देशद्रोही ठरवून त्यांचे कोर्टमार्शल केले जाते. गोस्वामी टोळीने संरक्षण खात्यातील गुपिते चोरून चव्हाटय़ावर आणली हा देशद्रोहच आहे, त्यांची चैाकशी होणार का, लष्कराची गुपिते उघड केल्याच्या आरोपाखाली केंद्र सरकार या माणसाला तुरुंगात पाठविणार आहे काय?,'' असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.  

हेही वाचा : अर्णब गोस्वामीने भाजपचे तोंड काळे केले......
 
मुंबई : "मुंबई पोलिसांनी फक्त टीआरपी घोटाळय़ातील गोस्वामी टोळीचा सहभाग उघड केला नाही तर देशाचे संरक्षण तसेच राष्ट्रीय सुरक्षेबाबत या टोळीने चालवलेले खेळही उघडे केले आहेत. आता ‘अर्णब’चा आणि आपला काही संबंध नसल्याचे भाजप पुढारी सांगत आहेत. या गोस्वामी टोळीने राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचे तोंड काळे केले आहे,'' अशा थेट शब्दात शिवसेनेने 'सामना' च्या अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांवर कोरडे ओढले आहेत. मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बनावट टीआरपी रॅकेटमध्ये रिपब्लिक भारत, फक्त मराठी, महा मूव्ही आणि बॉक्‍स सिनेमा या चार चॅनेलचा समावेश होता. त्यांनी बनावट पद्धतीने टीआरपी मिळवल्याचे समोर आले होते. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट हे विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी उघड केले आहे. यामुळे खळबळ उडाली असून, गोस्वामींच्या अडचणीत वाढ झाली आहे. ‘ठाकरे सरकार’ने नाईक कुटुंबाच्या मागणीवरून या आत्महत्या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली आणि गोस्वामी महाशयांना बेड्या पडल्या. गोस्वामीची अटक म्हणजे महाराष्ट्रात आणीबाणीच लागू झाल्याची प्रतिक्रिया तेव्हा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली होती, पण आता अर्णब गोस्वामी याचे जे ‘व्हॉट्सऍप चॅट’ उघड झाले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख